कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ओटवणे येथील बाबाजी गावकर यांचा श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीच्यावतीने सन्मान..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२०:-* पेडणे नजिक तुये – मुरमुसे येथील श्री सटीदेवी महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार कामात सहकार्य केल्याबद्दल ओटवणे येथील बाबाजी पांडुरंग गावकर यांचा श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीच्यावतीने सन्मान करण्यात आला. श्री सटीदेवी महालक्ष्मी पुन:प्रतिष्ठापना सोहळ्यात गोवा हाऊसिंग बोर्ड कार्पोरेशनचे चेअरमन तथा मांद्रे मतदार संघाचे आमदार जित आरोलकर यांच्याहस्ते बाबाजी गावकर यांना शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या सत्कार सोहळ्याच्या व्यासपिठावर पै काणे कंपनीचे संचालक सुनिल पै काणे, उत्सव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ कलशावकर, तुये ग्रामपंचायतच्या सदस्या अनिता साळगावकर, श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष सचिन कोचरेकर, सचिव सुदेश नाईक, बांधकाम समिती अध्यक्ष सुभाष साळगावकर, सचिव कृष्णा तळवणेकर, मार्गदर्शक लक्ष्मण खरवत आदी मान्यवर उपस्थित होते.

ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा माजी उपसरपंच असलेले बाबाजी गावकर ओटवणे देवस्थानचेही मानकरी आहेत. बाबाजी गावकर यांनी श्री सटीदेवी महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार कामात श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांच्या या सहकार्याबद्दल श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीच्यावतीने बाबाजी गावकर यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरेश नाईक यांनी तर आभार रावजी जाधव यांनी मानले.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!