🟥 भोजन योजनेच्या नावाखालील पैशांची लूट थांबवावी!
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१७:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भोजन वाटप लाभ देण्याऐवजी भोजन योजनेवर खर्च होणारी रक्कम केंद्र सरकारच्या धोरणानुसार (थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर रक्कम जमा करणे) दरमहा नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या बँक खाती जमा करण्यात यावी, अशी मागणी बांधकाम कामगार महासंघाने यापूर्वीच केली आहे. मात्र, सद्यस्थितीत भोजन योजनेचा लाभ जिल्ह्यातील कामगारांना देण्यासाठीची कार्यवाही सुरू असून हे जेवण कामगारांपर्यंत पोहोचते का?, ज्यांच्यापर्यंत जेवण पोहोचते त्यांना वेळेत मिळते का? असे अनेक प्रश्न आहेत. भोजन योजनेच्या नावाखाली मंडळाच्या पैशांची होणारी लूट थांबविण्यात यावी, अशी मागणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांनी केली आहे.
बांधकाम कामगार हे प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी भोजन योजना सुरू करून त्या कामगारांपर्यंत पोहोचविणे जिल्ह्यात शक्य नाही. जरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला तरीही ते वेळेत मिळणार नाही. यात नाहक पैसे वाया जाणार असून ही रक्कम कामगारांच्या बँक खाती जमा करण्याची संघटनेची मागणी आहे. मात्र, त्याबाबत कार्यवाही न करता हे भोजन देण्याचा ठेका देण्यात आला व त्यानुसार कार्यवाहीही सुरू करण्यात आली. ठेकेदार कंपनीने ग्रामपंचायत स्तरावरील दिलेल्या कामगार संख्येच्या अहवालाबाबत कोणतीही चौकशी न करता ठेकेदार कंपनीशी हात मिळवणी करून तसेच संघटना व कामगारांच्या शंका निरसनाकडे दुर्लक्ष करून अतिशिघ्रतेने भोजन योजना वाटप सुरु केले आहे, त्यामुळे ही कार्यवाही शंकास्पद असल्याचे साटम यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांपैकी हजारो कामगार २०१९-२० च्या आर्थिक लाभांपासून वंचित आहेत. सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात कामगारांनी ऑनलाईन सादर केलेल्या लाभ अर्जांची लाभ रक्कमही कामगारांच्या बँक खाती जमा झाली नाही. मंडळाकडून घोषित खरेदीसाठीचे अर्थसहाय्यापासून वंचित आहेत. एकीकडे ही वस्तुस्थिती असताना दुसरीकडे भोजन देण्याच्यादृष्टीने शिघ्रगतीने कार्यवाही सुरू करण्यामागचा उद्देश काय? असा सवाल श्री. साटम यांनी केला आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

