कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ओव्हरलोड वाळू वाहतूक कोणाच्या आशिर्वादाने ; परशुराम उपरकर

 

*🟥 सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर मनसेकडून केले जाईल आंदोलन..आशिष सुभेदार यांची माहिती*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-१२:-* सावंतवाडी तालुक्यात महसूल अधिकाऱ्यांच्या समक्ष अनधिकृत व ओव्हरलोड वाळू वाहतूक जोमात सुरु असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून वाळू वाहतूक करणारे डंपर सोडण्यात येत आहेत याप्रकरणी सावंतवाडी तहसीलदार यांना जाग आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर मनसेकडून माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती म.वि.से. जिल्हा अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतुकीवर एकीकडे कारवाई होत असताना सावंतवाडी तालुक्यात मात्र महसूल विभागाकडून अनधिकृत व ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे डंपर राजरोसपणे सोडले जात आहेत. जिल्हाधिकारी यांनी अवैध वाळू वाहतुकीला चाप बसावा यासाठी सगळीकडे महसूल विभागाची भरारी पथके नेमली आहेत तशीच पथके सावंतवाडी तालुक्यातील ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत मात्र त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना देखील वाळू माफिया, लोकप्रतिनिधी व तहसीलदार यांच्या आशीर्वादाने बऱ्याच वेळा कारवाई न करता डंपर सोडुंन देण्याचे प्रकार सुरु आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला सावंतवाडी महसूल यांनी केराची टोपली दाखवली सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे महसूल विभागाने पकडलेले पाच डंपर तालुक्यातील बड्या अधिकाऱ्याने फोन करताच सोडून देण्याचा प्रकार गुरुवारी घडला त्यात काही लोकप्रतिनिधी यांचा हि डंपर होता. त्या प्रकारबाबत दिवसभर शहरात उलटसुलट चर्चा होती. तालुक्यात तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आलेले भरारी पथके तर वाळू माफियाकडून ठरलेले हफ्ते घेऊन रात्रीच्या वेळी डंपरवर कोणतीही कारवाई न करता ते सोडून देत आहेत त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे असा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला असून सावंतवाडी तहसीलदार यांना जाग आणण्यासाठी मनसे तर्फे लवकरचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे उपरकर यांनी सांगितले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!