आणखी

🟥 किशोरवयीन प्रेम नियंत्रणाबाहेर, निर्णय देताना न्यायालयाने काळजी घ्यावी!

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 दिल्ली, दि-११:-* दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवले आहे. एका अल्पवयीन मुलीशी सहमतीने संबंध ठेवल्यामुळे निर्माण झालेल्या POCSO प्रकरणात एका किशोरवयीन मुलाला दोन महिन्यांसाठी जामीन देताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, किशोरवयीन मुलांचे प्रेम न्यायालय नियंत्रित करु शकत नाहीत.न्यायाधीशांनी जामीन याचिका हाताळताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे निरिक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवले.

चित्रपट आणि कादंबऱ्यांमधील रोमॅंटिसीझमचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करणारी किशोरवयीन मुले कायदा आणि संमतीच्या वयाबद्दल अनभिज्ञ राहतात, असेही निरीक्षण न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी नोंदवले.

दरम्यान, एप्रिल 2021 मध्ये 16 वर्षीय मुलीसोबत पळून गेलेल्या 19 वर्षीय मुलाच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. मुलगी अल्पवयीन असल्याने मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने सध्याच्या प्रकरणात नमूद केले आहे की, फिर्यादी आणि आरोपी हे संबंधित वेळी अनुक्रमे 16 आणि 19 वर्षे वयाचे होते. आता ते महिन्याच्या शेवटी लग्न करणार होते. हे लक्षात घेऊन न्यायमूर्ती शर्मा यांनी मुलाला दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला.

तपासादरम्यान, मुलगी सात आठवड्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले आणि तिचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. डीएनए रिपोर्टमध्ये मुलगाच त्यांच्या बाळाचा पिता असल्याची पुष्टी झाली. या प्रकरणादरम्यान मुलीने न्यायालयात सांगितले की, घटनेच्या वेळी ती 16 वर्षांची होती. तथापि, तिच्या शाळेतील नोंदी तिच्या दाव्याला समर्थन देत नाहीत.

तथापि, न्यायालयाने नमूद केले की, मुलीने सीआरपीसी कलम 161 आणि 164 अंतर्गत तिच्या वक्तव्यात आणि न्यायालयात नोंदवलेल्या साक्षीत सातत्याने सांगितले आहे की, ती त्याच्यासोबत तिच्या स्वत:च्या इच्छेने गेली होती. कारण तिला त्याच्यावर प्रेम जडले होते.

तसेच, सध्याच्या प्रकरणातील एफआयआर फिर्यादीच्या बहिणीने 2021 मध्ये भारतीय दंड संहिता आणि POCSO अंतर्गत कथित गुन्हा केल्याबद्दल बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीवर दाखल केला होता. त्यानंतर, हे जोडपे चेन्नईमध्ये सापडले होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!