🟥 लक्झरीतून आंबा वाहतुकीस आडकाठी नको!
*🟥 पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सातारा ‘आरटीओ’ला सूचना*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि.१०* कोकणातून शेतकरी थेट मुंबई, पुणे आदी मार्केटमध्ये लक्झरी बसद्वारे जाणाऱ्या आंब्याच्या पेट्या न अडविण्याच्या सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातारा आरटीओ विभागाला दिल्या आहेत. तसेच गेल्या आठवड्यात ज्या आंब्याच्या पेट्या अडविण्यात आल्या होत्या त्यासंदर्भात तातडीने सविस्तर अहवालही सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.
सध्या आंबा, फणस, काजू आदी कोकणातील फळांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मात्र, आंबा
पेट्यांच्या व्यवसायात मूळ शेतकऱ्यापेक्षा दलाल फायदा अधिक काढतात. यामुळे कुडाळ, देवगड, मालवण आदी भागातील आंबा बागायतदार मुंबई, पुणे येथे दोन दोन डझनाचे बॉक्स लक्झरीने पाठवित होते. मात्र, सातारा आरटीओकडून गेल्या आठवड्यात अशाप्रकारे लक्झरी बसने पाठविलेले आंबे उतरवून घेण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर अशा लक्झरीमधून . उतरवून घेतलेले आंबे नंतर टेम्पोच्या माध्यमातून पाठविण्यात आले होते.
लक्झरी बसच्या माध्यमातून शेतकरी थेट आंबा मार्केटला नेत होते. यामुळे काही अंशी दलालांना आळा बसत होता. त्यामुळे आरटीओ व दलाल यांचे यात संगनमत असल्याची शक्यताही काळसेकर यांनी व्यक्त करीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर चव्हाण यांनी सोमवारी तातडीने बैठक आयोजित केली होती. सदरच्या बैठकीत अशाप्रकारे लक्झरीमधून आंबे उतरवून घेण्याच्या प्रकाराबाबत पालकमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली..
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

