🟥 वीज वितरण कंपनीच्या अकार्यक्षम कारभाराबद्दल येत्या आठ दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास वाफोली ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०९:-* वाफोली गावामध्ये असलेल्या सर्व घरगुती वीज ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे.तसेच वाफोली अन्नपूर्णावाडी येथील असलेल्या वीज वितरण कंपनीच्या लाईनवर वेली झाडे वाढल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे अनेकांची वीज उपकरणे नादुरुस्त झालेली आहेत. अलीकडे देऊळवाडी येथील ट्रान्सफार्मर कडील डी.पी.नादुरुस्त झाला आहे.याबाबत बांदा येथील महा.राज्य वीज वितरण कार्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्यांचे मार्फत कोणतीही कारवाही करण्यात आली नाही.वाफोली गावतील वायरमन कडून वीज लाईनच्या देखभालीबाबत लक्ष दिला जात नाही.वाफोली ग्रामपंचायत नळयोजनेस म.रा.वि.वि.कंपनी मार्फत इन्सुली फिडर वरून थ्री फेज लाईनचे कनेक्शन देण्यात आले आहे.सदर थ्री फेज लाईन वारंवार नादुरुस्त होत असल्याने अनियमित वीजपुरवठ्यामुळे वाफोली नळ योजनेचा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे.त्यामुळे नाहक ग्रामस्थांच्या रोषास ग्रामपंचायतीस सामोरे जावे लागत आहे.याबाबतही वेळोवेळी म.रा.वि.वि.कार्यालयाशी पत्र व्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नाही.या सर्व बाबींचा विचार करून आठ दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास वाफोली ग्रामस्थांकडून वीज वितरण कंपनीच्या अकार्यक्षम कारभाराबद्दल तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मा.कार्यकारी अभियंता,महा.राज्य वीज वितरण कं.प्रधान कार्यालय कुडाळ यांना निवेदना द्वारे देण्यात आला आहे.यावेळी वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस,ग्रामपंचायत सदस्य विष्णु (मंथन)गवस,माजी सरपंच मारुती गवस,सामाजिक कार्यकर्ते सतीश गवस,महेश गवस,बंटी गवंडळकर,माने उपस्थित होते.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

