मला पराभूत करण्याची केसकरांना एवढीच खुमखुमी असेल तर मैत्रीपूर्ण लढत लढावी-तेली
मला पराभूत करण्याची केसकरांना एवढीच खुमखुमी असेल तर मैत्रीपूर्ण लढत लढावी-तेली
मी निवडणुकीत पराभूत झालो तर राजकारणातून निवृत्ती घेईन
भाजपच्या पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय भाजप पक्षाने घेऊ नये अशी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची इच्छा असेल तर ते भाजप सोबत युती करायचा अट्टाहास का धरतात? त्यांना जर एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी या मतदारसंघापुरती मैत्रीपूर्ण लढत लढावी व तशी अशी गळ आपल्या पक्ष श्रेष्ठींना घालावी मग दूध का दूध व पाणी का पाणी होईल व त्यावेळी जर मी निवडणुकीत पराभूत झालो तर राजकारणातून निवृत्ती घेईन असे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले
मी पराभवाची हॅट्रिक करेन असे केसरकर यांचे म्हणणे असेल तर केसरकर आणि पुन्हा एकदा माझ्यासोबत निवडणूक लढवावी किंवा भाजप पक्ष जो उमेदवार देईल त्याच्यासोबत लढवावी केसरकर यांना पराभूत नाही केले तर मी राजकारणातून निवृत्त होईन असा पलटवार तेली यांनी केला आहे. केसरकरांनी जनतेला गृहीत धरून एवढे घमेंडी होऊ नये, गेल्या वेळी भाजपचा एबी फॉर्म माझ्याकडे असताना सुद्धा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने मी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला नाही, अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व फक्त 12000 मतांनी पराभव झाला पक्षाचे चिन्ह सोबत असते तर दीपक केसरकर यांची काय हालत झाली असती याचा विचार केसरकर यांनी करावा ,नाहक गमजा मारू नयेत, असे तेली यांनी म्हटले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची वनवा आहे ,केसरकरांनी मतदारांना वाऱ्यावर सोडले आहे, त्यामुळे मतदार निवडणुकीची वाट पाहत आहे, याचा विचारही केसरकर यांनी करावा, भाजप म्हणून पक्ष वाढविण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर आहे तसे केसरकर यांनी आपला पक्ष वाढवावा आमची त्याला कोणती हरकत नाही, मात्र भाजपच्या पालकमंत्र्यांनी मंजूर केलेली कामे आपलीच आहे असे सांगून जनतेत दिशाभूल करू नये असे राजन तेली आणि म्हटले आहे

