कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचे अध्यक्ष नरेंद्र पाटील गुरूवारी जिल्हा बँकेस देणार भेट ; आमदार नितेश राणे यांनी दिलय खास निमंत्रण

 

*🟥 लाभार्थ्यांसोबत साधणार संवाद” मनिष दळवी करणार स्वागत* 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२६:-* आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर असून या दौऱ्याच्या दरम्यान ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट देणार आहेत. यावेळी ते प्रधान कार्यालय सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यां सोबत संवाद साधणार आहेत. या संवाद कार्यक्रमास आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी, उपाध्यश अतुल काळसेकर, बँक संचालक उपस्थित रहाणार आहेत. या माध्यमातून मराठा तरुण तसेच अर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या होतकरूंना महामंडळच्या वतीने दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळतो याचा आढावा ते घेणार आहेत.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे मनिष दळवी स्वागत करणार आहेत. तसेच यावेळी नरेंद्र पाटील हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या योजना ग्रामीण भागातील मराठा तरुणापर्यंत पोहोचाव्यात आणी त्यासाठी काम करणारे प्रशासन अधिकारी बँक अधिकारी यांच्या समिती एकत्र बैठक व्हावी आणी ती बैठक स्वत: अध्यश नरेंद्र पाटील यांनी सिंधुदुर्गात येउन घ्यावी असे आग्रहाचे निमंत्रण आमदार नितेश राणे यांनी त्यांना दिले आहे. मराठा समाजातील उद्योग करू इच्छिणाऱ्या प्रत्येक प्रत्येकाला १५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज महामंडळ दिले जाते या सर्व कामकाजाचा आढावा या दौऱ्या दरम्यान अध्यक्ष नरेंद्र पाटील घेणार आहे. त्यासाठीच आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रण मान देऊन अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे गुरुवार दिनांक २७ एप्रिल रोजी येत आहेत. दुपारी दोन वाजता ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला भेट देणार आहेत. यावेळी जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यांबरोबर ते संवाद साधणार आहेत.या संवाद कर्यक्रमास लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनिष दळवी यांनी केले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍

 

*💫पी. एस. चोडणकर💫*

*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*

 

*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏

 

*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*

*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*

 

*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*

 

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*

🔹हार

🔸मंगळसूत्र

🔹मुहूर्तमणी

🔸अंगठ्या

🔹कानातले

🔸असे बरेच दागिने उपलब्ध

 

*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०

 

*📲संपर्क:- 8291276789*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!