🟥 रमेशराव शिर्के यांचे कार्य गौरवास्पद..
*🟥 चिवेलीत सत्कार प्रसंगी आगार प्रमुख रणजित राजेशिर्के यांचे गौरवोदगार..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-२५:-* रमेशराव शिर्के यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या आहेत. चिवेली सारख्या ग्रामीण भागात अत्याधुनिक संकुल उभे करून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. तसेच मराठा मंडळ मुलुंड च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून संस्थेचा नावलौकिक सर्वत्र पोचवला असून त्यांचे संपूर्ण कार्य गौरवास्पद आहे, असे गौरवोदगार चिपळूण आगाराचे आगार प्रमुख रणजित राजेशिर्के यांनी काढले.ते चिपळूण तालुक्यातीलचिवेली येथील आदर्श विद्यामंदिरात आयोजित चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे प्रमुख कार्यवाह व मराठा मंडळ मुलुंड चे अध्यक्ष रमेशराव शिर्के यांची अखिल मराठा फेडरेशन च्या सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ व आदर्श विद्यामंदिर यांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात प्रामुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेश शिर्के होते.
यावेळी आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांच्याहस्ते रमेशराव शिर्के यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी चिपळूण आगाराचे प्रमुख म्हणून उत्कृष्ट काम केल्याबद्दल आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार अध्यक्ष राजेश शिर्के यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सल्लागार दिनेश शिर्के,कार्यवाह रविंद्र शिर्के,शाखा समिती अध्यक्ष सुभाष शिर्के, स्कुल कमिटी चेअरमन यशवंत शिर्के, मुख्याध्यापक संजय चव्हाण, संस्थेचे सदस्य संतोष शिबे,सौ. सरिता शिर्के,शाखा समिती उपाध्यक्ष किसन कदम,सरचिटणीस प्रमोद साळवी,सहचिटणीस कुंदन जाधव, दिपक गोरीवले, सुधाकर शिबे,सदस्य प्रकाश दणदणे,तुकाराम वणे,प्रमोद कदम,शांताराम चांदिवडे,अजय बामणे यांच्यासह पालक,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गुरव यांनी केले तर आभार महेश चव्हाण यांनी मानले.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

