कोकणक्रीडागोवामहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🟥ओवळीये च्या ऋतिक सत्यवान सावंत ची क्रीडा क्षेत्रातील यशस्वी घौडदौड कायम…..*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि२४एप्रिल.:*
महाबळेश्वर पाचगणी येथील आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिरात उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये गावचा सुपुत्र ॠतीक सत्यवान सावंत आणि वेर्ले गावचा सुपुत्र श्रीकृष्ण राजन लिंगवत या दोघांची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशन ने आयोजित केलेल्या या दहा दिवशीय आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोच उपस्थित होते. या शिबिरात ऋतिक सावंत आणि श्रीकृष्ण लिंगवत या दोघांनीही चांगली कामगिरी बजावली त्यामुळे ऋतिक याची 58 किलो वजन गटातून तर श्रीकृष्ण लिंगवत याचे 55 किलो वजन गटातून राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येत्या जुलै महिन्यामध्ये पंजाबमध्ये ही राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा होणार असून यामध्ये ऋतिक सावंत व श्रीकृष्ण लिंगवत हे भाग घेणार आहेत. शालेय जीवनापासूनच ऋतिक याने क्रिकेट व किक बॉक्सिंग मध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये केली असून ग्रामीण भागामध्ये कुठल्याही सोयी सुविधा नसताना देखील शेती सांभाळात या दोन्ही क्रीडा प्रकारात त्यान मिळवलेले प्राविण्य ग्रामीण भागातील युवकांना मार्गदर्शक ठरावे असेच आहे. ऋतिक सत्यवान सावंत व श्रीकृष्ण लिंगवत या दोघांच्याही या यशाबद्दल दशक्रोशीतून त्यांचे कौतुक केले जात आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!