महाराष्ट्रसामाजिक

लहान मुलांना सोडून पोटापाण्यासाठी नागपुरात आले, नियतीने घेतला दाम्पत्याचा असा बळी..

🟥

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴नागपूर, दि-२२:-* नागपूर : नागपूर हे उपराजधानीचे शहर. आजूबाजूच्या गावातील लोकं येथे रोजगारासाठी येतात. बालाघाट, शिवणी, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातून काही लोकं कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त नागपूर गाठतात.

 

नागपूर हे जवळ असलेले रोजगाराचे हमखास शहर. पण, आता नागपूर शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांची तात्पुरती व्यवस्था केली जाते. पण, वादळ वाऱ्यात अशा झोपड्या निस्तनाबूत होतात. त्यात नुकसान होण्याची शक्यता मोठी असते. गुरुवारी आलेल्या वादळात टिनाचे शेड पडून दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.

 

छत्तीसगड येथील गौरीलाल पटेल (वय ३२) आणि त्यांची पत्नी रामला गौरीलाल पटेल (वय ३१) हे दोघेही नागपुरात मजुरीच्या कामासाठी आले. ते बलोदा बाजार येथील सोलदा गावचे रहिवासी. मनीषनगर येथील गुरुछाया सोसायटीतील सांझविला येथे ते मजुरीचे काम करायचे. राहण्यासाठी ठेकेदाराने त्यांना टिनाच्या झोपडीची व्यवस्था करून दिली होती.

टिनाच्या झोपडीतील टीन वादळवाऱ्यात उडाले. त्यानंतर त्यांनी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. ते झोपडीत पडले. यावेळी दोघेही पती-पत्नी यांच्या डोक्यावर ते टीन पडले. यांत ते गंभीर जखमी झाले. पटेल दाम्पत्याने काम करून घरी मुलांच्या पालनपोषणासाठी पैसे पाठवण्याचे ठरवले होते. गावातच दोन्ही मुलांना ठेवले होते. एक तीन वर्षांचा तर दुसरा पाच वर्षांचा अशा लहान मुलांना गावी ठेवून ते पोट भरण्यासाठी नागपूरला आले होते.

पण, निसर्गाच्या तांडवात होत्याचे नव्हते झाले. या दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही लहान मुले पोरकी झालीत. पटेल यांच्या कुटुंबीयांचे आता पालनपोषण कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

घटनेनंतर बेलतरोडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल मेश्राम घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या भागात बांधकाम सुरू आहेत. मजूर टिनाच्या झोपड्यांमध्ये राहतात. गुरुवारी आलेल्या वादळी पावसाने अनेकांच्या घराचे छत उडाले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!