*कसूर येथे आर्थिक व्यवहारातून हाणामारी, तिघांविरुद्ध गुन्हा
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वैभववाडी, दि.१९:* कुसूर टेंबवाडी येथे पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या मारहाणप्रकरणी वैभववाडी पोलीस स्थानकात दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारींनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वा. घडली..
कुसूर टेंबवाडी येथील दिगबंर प्रकाश पांचाळ हे देवगड एसटी बसस्थानकात चालक म्हणून नोकरीला आहेत. त्यांची जामसंडे श्रीकृष्णनगर येथील प्रमोद कृष्णा तेली यांच्याशी ओळख झाली. प्रमोद तेली व दिगबंर पांचाळ यांच्यामध्ये आंबा खरेदी-विक्री व अन्य आर्थिक व्यवहार सुरू होते. १७ एप्रिल रोजी प्रमोद, तेली, त्यांचे चुलते संतोष विश्राम तेली हे दिगंबर पांचाळ यांच्या घरी गेले असता तेथे आर्थिक व्यवहारावरून त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी दिगंबर पांचाळ यांनी पोलिसांत दिलेल्या
फिर्यादीत म्हटले आहे. प्रमोद तेली यांच्या पत्नीने आपल्याकडून ४० हजार रुपये उसने घेतले होते ते झालेल्या परत मागितल्याच्या रागातून प्रमोद तेली व संतोष तेली या संशयितांनी आपल्या घरी येत आपल्याला व आपल्या आई-वडिलांना लाकडी दांड्याने मारहाण केली. पोलिसांनी संशयित प्रमोद तेली व संतोष तेली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद तेली यांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार, दिगंबर पांचाळ यांच्याकडून आपल्या पत्नीने कधीही पैसे घेतलेले नाहीत. आमच्यामध्ये आंबा खरेदी-विक्री व्यवहारावरून आर्थिक व्यवहार होते. संशयित दिगंबर पांचाळ यांनी आपल्या पत्नीकडे पैशाची मागणी करून तिच्याशी दुचाकीच्या चावीवरून वाद घातला. या संदर्भात विचारणा केली असता दिगंबर पांचाळ यांनी आपल्याला दांड्याने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानुसार दिगंबर पांचाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

