कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीने मानले राजघराण्याचे आभार.

*कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीने मानले राजघराण्याचे आभार.*
कराची शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ इंग्लिश मीडियम नामांतरण कार्यक्रमास कुडाळ शहरवासीय व विद्यार्थी पालकांच्या वतीने विरोध झाला . या आंदोलनास सावंतवाडी संस्थानच्या राज घराण्याने या आंदोलानास संपूर्ण पाठिंबा दिल्यानंतर या आंदोलनाला धार आली व आंदोलन यशस्वीते कडे वळले .व मुजोर कमिटीला नाव खाली उतरावे लागले याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुडाळ इंग्लिश मीडियम संघर्ष समितीच्या वतीने सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बाळराजे लखन राजे व राणी शुभादेवी यांची भेट घेण्यात आली. व आपल्या सहकार्यामुळे हे आंदोलन यशस्वीतेकडे जाऊ शकले याची कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी राजानी दिलखुलास गप्पा करून सावंतवाडी संस्थानचे कुडाळ ही राजधानी होणार होती आणि राजे जयराम राजे व कुडाळ शहरातील अन्य गोष्टींची दिलखुलास चर्चा केली व भविष्यात कुडाळ तालुक्यात आणि शहरातील सर्व जडणघडणीमध्ये आपला सहभाग असेल असे आश्वासन दिले.
यावेळी अभय शिरसाठ, धीरज परब ओंकार तेली, रत्नाकर प्रभू ,सिद्धेश नाईक, संदेश पडते ,बंड्या शिरसाठ ,शैलेश घोगळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!