केसरीत जागेला कु़पण घालतांना रोखले, रमेश राऊळ व त्यांचा भाऊ यांच्या विरुद्ध उमेश सावंत यांची पोलीसात धाव
केसरीत जागेला कु़पण घालतांना रोखले, रमेश राऊळ व त्यांचा भाऊ यांच्या विरुद्ध उमेश सावंत यांची पोलीसात धाव
दोन्ही बंधू व सहकाऱ्यांपासून जीवितास धोका असल्याचा तक्रार अर्ज
केसरी येथील आपल्या खरेदी खताने विकत घेतलेल्या मालकीच्या जागेत सौ मनीषा उमेश सावंत यांचे पती उमेश सावंत कामगारांना घेऊन कुंपण घालत असताना सदर जागेत आमची वहिवाट आहे येथे कुंपण घालू नका असे सांगून शिवीगाळ करून कुंपणाचे खांब उखडून टाकून नुकसान केल्याबद्दल रमेश राऊळ व त्याचा भाऊ याच्याविरुद्ध तक्रार अर्ज आंबोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की केसरी येथे सौ मनीषा उमेश सावंत हिने सर्वे नंबर 119 ,120, 121, १ आर ही जमीन खरेदी खताने विकत घेतली आहे त्या जमिनीत त्यांचे पती उमेश सावंत व कामगार कुंपण घालण्यासाठी गेले असता त्यांना वरील दोन्ही इसमाने आमची या जागेत वहिवाट आहे, तुम्हाला कुंपण घालता येणार नाही, असे सांगून रोखून धरले व कुंपणासाठी घातलेले खांब उखडून टाकले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार उमेश सावंत यांनी आंबोली पोलीस ठाण्यात दिली असून संबंधित इ्समांपासून आपल्या जीवनात धोका असल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे.

