मालवणचे मुख्याधिकारी संतोष कुमार जिरगे यांनी घेतली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची सदिच्छा भेट.
मालवणचे मुख्याधिकारी संतोष कुमार जिरगे यांनी घेतली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची सदिच्छा भेट.
सावंतवाडी –
मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष कुमार जिरगे यांनी आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या,यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
बबन साळगावकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत संतोष कुमार जिरगे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी होते,सुमारे दिड वर्ष त्यांनी सावंतवाडीचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले,यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले,प्रशासनावर आदरयुक्त भीती असणारा नगराध्यक्ष अशी बबन साळगावकर यांची ओळख होती मात्र तेवढ्याच ताकदीने ते कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहयचेत याची आठवणही यावेळी मुख्याधिकारी जिरगे यांनी करुन दिली.व संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी शहराचे एक वेगळे पण आहे म्हणून या ठिकाणी येण्याचा मोह सुटत नाही असे गौरवोद्गार जिरगे यांनी काढले व बबध साळगावकर यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सामाजिक बांधिलकी कीचे रवी जाधव,माजी नगरसेवक उमेश कोरगावकर,सुंदर गावडे,मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे आदी उपस्थित होते.

