🟥माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारीची दखल
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग :*
*🎴 मालवण, दि.०८:* मालवण प्रभारी तहसीलदारांबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते रमण वाईरकर यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्षात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल तात्काळ घेण्यात आली असून कोकण विभागातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षातील पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी तथा महसूलचे उपायुक्त मकरंद देशमुख यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देत योग्य चौकशी करून शासनाच्या प्रचलित कायदे, नियम, धोरणानुसार तत्काळ कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले आहे.
तसेच अर्जदारांना अंतिम अहवाल परस्पर कळविण्यात यावा. त्याची एक प्रत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात यावी, असेही निर्देश आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे मालवण तालुका अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते रमण वाईरकर यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते, मालवण तहसीलदार यांची नियुक्ती होऊन तीन ते चार महिने झाले आहेत. परंतु त्यांनी अद्याप जनताभिमुख एकही न्यायनिवाडा केलेला नाही. तहसीलदार फक्त वाळू वाहतूक करणाऱ्यांना पकडण्यासाठी रात्रीचा दिवस करतात. कार्यालयात पण कामकाजाची वेळ संपल्यानंतर काही वेळासाठी येतात. म्हणजे वाळूत एवढं दडलंय काय? जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता मालवण तहसीलदार हे प्रभारी आहेत. म्हणून ते केसीस चालवित नाहीत, म्हणजे फक्त महसूल गोळा करण्यासाठी तहसीलदार नियुक्ती करण्यात आले आहे का? असे सवाल त्यांनी केले
मालवण तालुक्यासाठी कायमस्वरुपी तहसीलदारपद तात्काळ नियुक्त करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

