महाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

कुडाळ इंग्लिश मीडियम स्कुल हे नाव आहे तसच राहिलं पाहिजे ! ; सावंतवाडी संस्थानचे लखमराजे भोसले – सावंत यांनी व्यक्त केलं ठाम मत*

*🟥 कुडाळ इंग्लिश मीडियम स्कुल हे नाव आहे तसच राहिलं पाहिजे ! ; सावंतवाडी संस्थानचे लखमराजे भोसले – सावंत यांनी व्यक्त केलं ठाम मत*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-०७:-* कुडाळ हे नाव कुडाळवासियांची शान असून हे नाव तसच राहिल पाहिजे. तेव्हा सुध्दा आणि आता सुध्दा आम्ही लोकांना काय पाहिजे हे पाहत आलो आहोत. आम्ही लोकांसाठीच काम करत आहोत. आता तुम्हा सर्व लोकांचे म्हणणे आहे की, कुडाळ इंग्लिश मीडियम स्कुल हे नाव आहे तसच राहिलं पाहिजे, त्याला आमचा पाठिंबा असल्याचं ठाम मत सावंतवाडी संस्थानचे लखमराजे भोसले-सावंत यांनी व्यक्त केलं. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी आणि कुडाळवासियांनी टाळ्यांच्या कडकडाट करत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कुडाळ येथील कराची शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ इंग्लिश मीडियम स्कुलला डॉ. अनिल नेरूरकर यांचे नाव देण्याचा घाट दोन वर्षापूर्वी घालण्यात आला होता. कुडाळवासियांनी त्यावेळी आंदोलन केल्यामुळे तूर्त तो विषय थांबला होता. मात्र, अलिकडेच संस्थेने ते नाव कागदोपत्री नोंदवून घेतल्याची माहिती माजी विद्यार्थी आणि कुडाळवासियांना मिळाली. याबाबत कुडाळवासियांनी संस्थेला जाब विचारत डॉ. नेरूरकर यांच्या नावाला तीव्र विरोध करत सावंतवाडी संस्थानचे लक्ष वेधले. त्यानंतर माजी विद्यार्थी आणि कुडाळ वासियांच्या वतीने अॅड. सुहास सावंत यांच्या विनंतीवरून सावंतवाडी संस्थानचे राजे लखमराजे भोसले आज, शुक्रवारी कुडाळ येथील मराठा समाज येथे दाखल झाले. यावेळी तमाम कुडाळवासियांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी झालेल्या बैठकीत लखमराजे भोसले म्हणाले की, आपल्याकडे संस्थेची मंडळी व कुडाळवासियही आले होते. दोन्ही बाजूकडून म्हणणे आम्ही ऐकून घेतले. त्यानंतर राजेसाहेबांनी आणि आम्ही ठरवल की, कुडाळच्या लोकांना काय पाहिजे? संस्थेला काय करायचे आहे ते संस्था करेल. पण कुडाळवासियांना काय पाहिजे ते प्राधान्याने महत्वाचे आहे. तेव्हा पण आणि आता पण आम्ही लोकांसाठीच काम करत आलेलो आहोत. आम्ही या संस्थेबाबत अधिक माहिती काढली. आम्हालाही समजले तुम्ही चारजण आहात की, मोठ्या संख्येने आहात ते आम्हाला दिसत आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आमचेही म्हणणे तसेच आहे. त्यामुळे तुमच्या म्हणण्याला आमचा पाठिंबा आहे. आज ज्यांनी पैसे दिले, उद्या अशाच प्रकारचे पैसे कुणीतरी देतील आणि व बदलेल हे योग्य नाही. आम्ही म्हणतो त्यावेळी बापूसाहेबांनी कुडाळसाठी मोठी मदत केली. पण आम्ही म्हणत नाही की, याठिकाणी बापुसाहेबांचे नाव द्या. खरे तर कुडाळ हे शहरवासियांची शान आहे. ती शान तशीच राहिली पाहिजे. माझे म्हणणे आहे की, कुणीच लोकांना दुखवू नये. नेरूरकर अमेरिकेतून इथे लगेच येवू शकत नाहीत. इथे तर तुम्हीच सर्वसामान्य लोक लगेच येणारे आहात. त्यामुळे कुडाळ या नावासाठी आमचा १०० टक्के पाठिंबा राहिल. आम्हाला माहिती आहे शिक्षण संस्था कशा चालवायच्या, राजेसाहेब बेळगांवला गेले असल्यामुळे आज येवू शकले नाहीत. ते आले की आम्हीच इथे येवून याप्रश्नी चर्चा करू. एवढी वर्ष आम्ही लोकांमध्ये मिसळलो नाही. पण आता आम्हाला लोकांमध्ये राहिलं पाहिजे. आता आम्ही लक्ष देणार असल्याचे लखमराजे भोसले यांनी सांगितले.
यावेळी ॲड. सुहास सावंत म्हणाले की, कुडाळ हे नाव कुडाळवासियांची शान असून अस्मिता आहे. कुडाळ नाव काढून टाकणे कुणालाच पटणार नाही. कुडाळ हायस्कुलची ही संस्था कुडाळवासियांची आहे. तसेच सावंतवाडी संस्थांनचे राजे यांचे नाव घेतल्याशिवाय ही संस्था पूर्ण होवू शकत नाही. सावंतवाडी संस्थानच्या बापूसाहेबांनी हे रोपटे त्यावेळी लावल्यामुळे त्याची फळे आता चाखता येत आहेत. मात्र, ४ जुलै ही बापूसाहेबांची पुण्यतिथी आहे. मात्र ल, या संस्थेने कधीच त्यांची पुण्यतिथी साजरी केली नसल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखवली. या संस्थेतील मंडळींनी उन्मतपणे बोलली तरी सुध्दा ही तरूण मंडळी शांत राहिली. कारण ही शाळा माझी आहे या एकाच भावनेने… आपण कायद्यात गेलो तर संस्थेतील मंडळी आतमध्ये जातील असा सूचक इशाराही यावेळी सावंत यांनी दिला. अभय शिरसाट आणि काका कुडाळकर यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. तसेच कुडाळ संघर्ष समितीचे कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲड सुहास सावंत यांनी काम पहावे अशी विनंती केली.
यावेळी ॲड. सुहास सावंत, अभय शिरसाट, काका कुडाळकर, आनंद शिरवलकर, धीरज परब, ओंकार तेली, दीपलक्ष्मी पडते, राजन नाईक, सुनील भोगटे, शैलेश घोगळे, संदेश पडते, अमेय पेडणेकर, निकु म्हाडेश्वर, चिन्मय बांदेकर, सिध्देश नाईक, राजू सावंत, अजय आकेरकर, शशांक पिंगुळकर, किरण शिंदे, उदय मांजरेकर, अजय शिरसाट, स्वरूप सावंत, दीपक सावंत, सुशिल चिंदरकर, कृष्णा तेली, भास्कर परब, उल्हास कुडाळकर, सागर माळकर, अवधूत शिरसाट, बंड्या शिरसाट, मंदार चंद्रकांत शिरसाट आदिसह माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन सिध्देश नाईक यांनी केले तर आभार धीरज परब यांनी व्यक्त केले.

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

👉( टीप:- नियम व अटी लागू)

_तसेच_

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!