🟥व्हॉटस्अॅपवरील व्हीडिओमुळे मारहाण
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 आंबोली, दि.०५:* आंबोली गावठणवाडी व्हॉटस्अॅप ग्रुपवरील मेसेजमुळे हाणामारी झाली. यात दोघेजण जखमी झाले. जखमींवर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.आपल्याला तसेच पत्नीला या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याची तक्रार यशवंत नाना गावडे (४३. रा. कामतवाडी) यांनी आंबोली जखमी पोलिसांत दिली आहे. आंबोली पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आंबोली येथील एका व्हॉटस्अॅप ग्रुपवर पिण्याच्या पाण्यात काही मुले आंघोळ करतानाचा व्हीडिओ काहींनी टाकला. त्यावर प्रत्येकाने आपली मते व्यक्त केली. मीही माझे मत व्यक्त केले की, ते पिण्याचे पाणी आहे. हे बरोबर नाही. यावर अर्जुन न्हानू राऊत (रा. गावठणवाडी) याने, ‘कुत्री अशीच भुंकतात’, अशी पोस्ट टाकली. त्यावर आपण त्याला विचारणा केली आणि हा येथे विषय वाढवू नको, असे सांगितले. त्यावर त्याने शिवीगाळ केली.. माझ्या पत्नीच्या फोनवर फोन केला. त्यावर आपण आणि पत्नी श्रद्धा असे दोघेजण अर्जुन राऊत यांच्या घरी या संदर्भात विचारणा करण्यासाठी गेलो असता अर्जुन राऊत आणि त्यांचे वडील न्हानू वासुदेव राऊत यांनी आपल्याला लोखंडी रॉड, काठीने मारहाण केली तसेच डोळ्यात मसाला मारून मारहाण केली. तसेच न्हानू राऊत यांनी आपल्या पत्नीला काठीने मारहाण केली. त्यानुसार आंबोली पोलिसांनी अर्जुन न्हानू राऊत तसेच न्हानू वासुदेव राऊत यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

