गुन्हा अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी-कत्तलखाण्यात जाणाऱ्या मुक्या गाईंचे प्राण वाचविले
गुन्हा अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी-कत्तलखाण्यात जाणाऱ्या मुक्या गाईंचे प्राण वाचविले..
आयशर टेम्पो मधून तेरा गायिंची होणारी अवैध वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखली..चालक पसार
पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल व गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक संदीप भोसले यांचे हिंदू प्रेमींनी मानले आभार..
कणकवली –
गुन्हा अन्वेषण शाखेचे हवालदार प्रमोद काळसेकर यांना रात्र तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरून अवैधरीता गायींची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती, त्या अनुषंगाने हवालदार काळसेकर यांनी गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक संदीप भोसले यांना माहिती कळविली व महामार्गावर तीन ठिकाणी गस्तीपथके नेमण्यात आली, एक पथकि कसाल मध्ये कार्यरत असताना ओसरगाव टोल नाक्या पुढे कणकवलीच्या दिशेने आयशर टेम्पो उभा असल्याचे समजले पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली तत्पूर्वी चालक चावी घेऊन पसार झाला होता, पोलिसांनी त्या टेम्पो मधील अकरा गाई व दोन वासरे मिळून 13 जनावरे ताब्यात घेतली पोलिसांच्या या कामगिरीमुळे तेरा मुक्या प्राण्यांचे जीव वाचले त्यामुळे पोलिसांना हिंदू प्रेमींनी धन्यवाद दिले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की काल रात्रोच्या सुमारास गुन्हा अन्वेषण शाखेतील पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना एम एच ०७ पी ३६५२या आयशर टेम्पो मधून गुरांची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती, त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी गस्तीपथके तैनात केली, याच वेळी कसाल येथे असलेल्या पथकातील प्रमोद काळसेकर यांना पुन्हा फोन आला व त्यांनी हा टेम्पो ओसरगाव टोल नाक्याजवळ असल्याचे सांगितले पोलिसांनी तातडीने तिथे जात कारवाई केली.
या कारवाईत 11 गायी दोन वासरे मिळून 13 जनावरे आढळून आली यातील एक गाय हिला उठा बसता येत नसल्यामुळे तिच्यावर कणकवली पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत,तर बारा गाईंना सुडकुली धाम सरंबळ कुडाळ या ठिकाणी देखभाल खाली ठेवण्यात आले आहे, याप्रकरणी निर्दयी पणे गुरांची वाहतूक करने त्यांचे हाल करने,आधी कलमा खाली अज्ञात टेम्पो चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कामी ए, एस, आय ,गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर ,पोलीस हवालदार किरण देसाई ,पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे ,अमोल पालकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महिंद्रा घाग यांनी काम पाहिले.ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

