🟥 रक्तपिशवी दरवाढीविरोधात शासकीय रूग्णालयावर युवासेनेचा ३ एप्रिलला मोर्चा
🟥 युवासेनेचे जिल्हाप्रुमख सुशांत नाईक माहिती;रक्त पिशवीचा दर ४५० रुपयांवरुन दर ११०० रुपये..
*🟥 शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा राणेंचा प्रयत्न*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
*🎴कणकवली,दि.३१:-* शिंदे-फडणवीस सरकारने रक्तपुरवठा सेवा शुल्काचे नवीन दर लागू केले आहेत. ठाकरे सरकारच्या काळात शासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशवीचा दर ४५० रुपये होता. आता हा दर ११०० रुपये करण्यात आला आहे. तर अशासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशवीचा दर १५५० रुपये करण्यात आला आहे. हे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने या दरवाढीविरोधात युवासेनेच्यावतीने ३ एप्रिल रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती युवासेनेचे जिल्हाप्रुमख सुशांत नाईक यांनी दिली.शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा राणेंचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू राठोड, सचिन आचरेकर, तेजस राणे, ललीत घाडीगावकर, आदित्य सापळे आदी उपस्थित होते.
केंद्रातील भाजप सरकारने जीवनावश्यक सर्वच वस्तूंचे दर भरमसाट वाढविले आहेत. राज्य सरकारनेदेखील लोकांचा जीव वाचवणाऱ्या रक्तपिशवीची किंमत ११०० रुपये केली आहे. मात्र, या दरवाढी विरोधात युवासेनेमार्फत आक्रमक होत सरकारला जाब विचारला जाणार आहे.
रक्तपिशव्यांचा दरात झालेल्या प्रचंड दरवाढी विरोधात युवा सेनेतर्फे जिल्हा शासकीय रूग्णालयावर ३ एप्रिलला मोर्चा काढला जाणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज दिली. तर शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा प्रयत्न राणेंकडून सुरू असल्याचा आरोपही श्री.नाईक यांनी केला.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे असंवेदनशील आहे. रक्तपिशव्यांच्या दरात ४५० रूपयांवरून थेट ११०० रूपये एवढी वाढ करण्यात आली आहे. त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे याबाबत आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. परंतु राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. एरव्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयावर बोलणारे राणे आता महागाई आणि आरोग्याच्या प्रश्नावर मात्र गप्प आहेत. नाईक म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्गसाठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आले. आता शिंदे-फडणवीस सरकार असताना यांना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम का करता येत नाही. केंद्रात आणि राज्यातील कॅबिनेटमध्ये सिंधुदुर्गचे सूपूत्र आहेत. तसेच कणकवलीचे आमदारही सत्तेत आहेत. तरीही आरोग्याच्या दूरवस्थेकडे ही मंडळी दुर्लक्ष का करत आहेत. खरं तर राणेंनी आपलं मेडिकल कॉलेज काढले आहे.त्यामुळे त्यांना आता शासकीय मेडिकल कॉलेज बंद करायचं आहे,तशी त्यांची भूमिका दिसून येत असल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

