खाजगी जागेत घर बांधून पालिका कर्मचाऱ्याने खोटा असेसमेंट उतारा बनवून मिळवले वीज कनेक्शन; प्रथमेश कापडी यांचा खळबळजनक आरोप
▪️जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर तक्रारदार प्रथमेश कापडी करणार महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार..
▪️अनधिकृत व्यावसायिक व बांधकामावर कारवाईसाठी पालिका हातघाईवर..
▪️कर्मचाऱ्यांने केलेल्या बांधकामाबाबत दीडवर्षं तक्रार देऊनही ठोस कार्यवाही नाही; जनतेतून तीव्र संताप व्यक्त
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.२२: नगरपालिकेतील समिती लिपिक संतोष बापूजी शिंदे आणि इतर कुटुंब सदस्य यांनी आमच्या मालकीच्या जमिनीत बेकायदा घराचे बांधकाम करून नगर पालिकेत नोकरीचा वशिला वापरत स्वतःच्या नावाचा खोटा असेसमेंट उतारा तयार करून तो वीज कनेक्शन मिळण्याकरिता वीज मंडळ कार्यालयात जमा केला आहे, असा खळबळ जनक आरोप पुरावे सादर करीत या जागेचे मुखत्यार तरुण उद्योजक प्रथमेश कापडी यांनी पत्रकारांना प्रसिद्धी करीता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.
आपण या बाबत पालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली असून प्रशासनाकडून आपणास वेळीच न्याय न मिळाल्यास येत्या काही दिवसात महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कागदपत्रांसह सर्व पुरावे सादर करून तक्रार करणार असल्याचे प्रथमेश कापडी यांनी यात नमूद केले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील पाग गोपाळकृष्णवाडी येथे कापडी यांच्या मालकीची जमीन आहे. या जमिनीत संतोष शिंदे, प्रवीण शिंदे यांनी शिरकाव करून स्वतःचे आर.सी.सी. बांधकामाचे घर बांधले आहे. सदर बांधकामा साठी नगरपरिषद यांच्या कडुन कुठल्याही प्रकारचीं अधिकृत परवानगी घेतलेली नाही असे प्रथमेश कापडी यांचे म्हणणे आहे. या संदर्भात सर्व कागदपत्र कापडी यांच्याकडे उपलब्ध आहेत. शिंदे यांनी या जागेतील बांधलेल्या घरात वीज कनेक्शन मिळण्यासाठी वीज मंडळाकडे केलेल्या अर्जासोबत बनावट असेसमेंट उतारा जोडला आहे,असे अनेक उतारे त्यांनी व त्याचा कुटुंब सदस्यांनी तयार करून सादर केले आहेत. सर्वसामान्य माणसाला घरपट्टी नावावर करायची असेल तर आवश्यक ती कागदपत्रे यांची पुर्तता करता करता पळता भुई थोडी होते आणि ती पुर्तता झाल्याशिवाय सर्व शहानिशा केल्याशिवाय घरपट्टी नावावर केली जात नाही. परंतु तेच कोणत्याही प्रकारचा बांधकाम परवाना नसतानाही अनधिकृत पणे केलेल्या बांधकामाला कोणतेही कागदपत्रे न जोडता को-या फ़ॉर्म च्या आधारे मालकी पुरावे नसताना देखील भोगवाटदार न दाखवता तेही थेट मालकी नावाने नगरपालिकेतील संतोष शिंदे यांनी घरपट्टी व असेसमेंट उतारा तयार केला व त्याचा गैरवापर निरनिराळ्या शासकिय, निमशासकीय संस्थांमध्ये सर्व सेवा उपलब्ध मिळविण्याकरिता केला या प्रकरणी कापडी यांनी तक्रार करूनही मुख्याधिकारी यांची कार्यवाही थंडावली असल्यामुळे कापडी यांनी नाराजी व्यक्त केली आहे,माहिती अधिकारात कापडी यांना महावितरण विभागामध्ये प्राप्त झालेल्या माहिती मध्ये नवीन कनेक्शनसाठी संतोष शिंदे या नावे असलेला असेसमेंट उतारा जोडण्यात आलेला होता. या असेसमेंटवर तत्कालीन मुख्याधिकारी सन (२०१३/१४ ते २०१६/१७) आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच त्या वेळचे विशेष कार्यकारी अधिकारी भरत मारुती रेडीज यांनी कागदपत्रांवर सत्यप्रत म्हणून सही शिक्का दिला आहे. सदर असेसमेंटची नगरपरिषद मध्ये माहिती घेतली असता अशा क़ुठल्या ही असेसमेंटची नोंद नगरपरिषद मध्ये अस्तित्वात नाही अशी लेखी माहिती नगरपालिके मधून माहितीच्या आधारे लेखी स्वरुपात कापडी यांना प्राप्त झाली आहे. खोट्या असेसमेंट बद्दल मुख्याधिकारी यांना भेटून अनेक वेळा प्रत्यक्ष चर्चा करुन पत्रव्यवहार क़रून देखील त्यांनी क़ुठल्याही प्रकारची कार्यवाही केले नाही,,हिच कार्यवाही सर्वसामान्य लोकांबाबत तातडीने झाली असती याबाबत कापडी यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून वेळकाढू धोरण राबविले जात असल्यामुळे कापडी यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सदर चा गुन्हा हा फ़ौजदारी स्वरूपचा व दंडनीय आहें. नगरपरिषद कर्मचारी संतोष बापूज़ी शिंदे यांच्यावर भारतीय दंड संहिता मधीलचे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करावा असे पोलीस स्थानकात दिलेल्या लेखी तक्रारी मध्ये मागणी केली आहें. पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याशी आपले सविस्तर बोलणे झाले असून या प्रकरणी अधिक तपास करून गुन्हा दाखल केला जाईल असे आश्वासन पोळ यांनी दिले आहे. असे कापडी यांनी सांगितले. पो.नि.पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक संदीप वायंगणकर करीत आहेत.
*_💥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..💥_*
*🔥SALE!!!🔥SALE!!!🔥SALE!!!🔥*
*_🪔दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ब्रँडेड कपडे खरेदी करा आणि मिळवा ५०% ची सूट_💰*
_🏃🏻♂️👖👕वाट कसली बघताय? आज भेट द्या सयानी ड्रेसेस ह्या कपड्याच्या दालनाला! आणि मिळवा आपल्या आवडत्या कपड्यांवर ५०% ची सूट_💰🏃🏻♀️
*🏩आमचा पत्ता*
*सयानी ड्रेसेस*
उभाबाजार, चितारआळी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
*_📱संपर्क : 9423818666_*
*🔮ऑफर काही मर्यादित दिवसांसाठीच..*
*🔮अटी व शर्ती लागू..*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_