कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 ठेकेदारांकडून फुकट कामे करून घेण्याची सवय नाईक बंधूंनाच ; शिशिर परुळेकर

 

*🟥 छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्थलांतरणानंतर आता पॅचवर्कला देखील नाईक यांचा विरोध*

*🟥 सनराईस टॉवर बांधकामाची चौकशी करा अन्यथा आंदोलन छेडणार*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली,दि-२०:-* छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्थलांतरित केलेल्या पुतळ्याच्या जागी सर्विस रोडवर केलेले पॅकवर्क हे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वखर्चातून केले. व हे काम शिवसेनेचे पराभूत झालेले कलमठ येथील सरपंच पदाचे उमेदवार ज्यांना आमदार वैभव नाईक यांनी तिकीट दिले होते त्या ठेकेदार रामदास विखाळे यांनी केले. नाईक बंधूंना नेहमीच ठेकेदाराकडून फुकट कामे करून घ्यायची सवय असल्याने सुशांत नाईक यांना हे काम देखील फुकटच करून घेतले असे असे वाटले. ठाकरे गटाच्या या काम केलेल्या ठेकेदाराने काम नगराध्यक्षांनी स्वखर्चाने नाही तर फुकट करून घेतले असे जर जाहीर केले तर सुशांत नाईक यांचे म्हणणे आम्ही खरे मानू असा टोला नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी लगावला.
सुशांत नाईक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना श्री. परुळेकर यांनी म्हटले आहे की, कणकवली नरडवे चौकातील सनराईस टॉवर चा असेसमेंट होत नसल्याने सुशांत नाईक हर वैफल्यग्रस्त झाले आहेत. या टॉवरचे साईट मार्जिन सुटले नसून अतिरिक्त बांधकाम केल्याने हा संपूर्ण टॉवर अनधिकृत ठरला असल्याचेही श्री परुळेकर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाला सातत्याने विरोध करण्याचे काम सुशांत नाईक यांनी केले. त्यांच्या सत्तेच्या काळात ते जी कामे करू शकले नाहीत ती कामे आम्ही धडाका लावत पूर्ण केल्याने सुशांत नाईक यांना धडकी भरली आहे. छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाला विरोध केल्यानंतर आता येथील पॅचवर्कला देखील हे विरोध करणार हे आम्हाला माहीत होतं. व अखेर तेच झालं. कणकवली शहरात नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली विकासाचा जो धडाका लावला गेला या धडाक्या मुळेच सुशांत नाईकांना धडकी भरली असून यावेळी दुसऱ्याला कुणाला तरी पुढे करण्यापेक्षा सुशांत नाईक यांनी स्वतःच नगराध्यक्ष पदाकरिता उभे राहावे असे आव्हान देखील श्री. परुळेकर यांनी दिले आहे. तसेच सनराईस टॉवरच्या बांधकामाची चौकशी करा. अन्यथा आम्ही सर्व नगरसेवक या अनधिकृत बांधकामाविरोधात आंदोलन छेडणार असा इशारा देखील श्री परुळेकर यांनी दिला आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!