मडुरा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्तीचे वितरण
प्रतिनिधी – राकेश परब
बांदा : २१-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्य करणारी ग्लोबल फौंडेशन या संस्थेने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी जिल्ह्यातील गरीब, होतकरू व हुशार अशा १५१ विद्यार्थ्याना ‘ज्ञानज्योत शिष्यवृत्ती’चे वितरण करण्यात आले. थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रुपये ३००० रुपये प्रत्येकी प्रदान करण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कुल मडुरा या प्रशालेतील पाच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना रुपये तीन हजार प्रत्येकी देऊन त्यांच्या शैक्षणिक उज्ज्वल भविष्यासाठी मदत केली आहे.
संगणक प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, संगीत, पीस क्लब असे विविध उपक्रम राबवित असलेली संस्था या वर्षी २००पेक्षा जास्त गरीब व गरजू कुटुंब यांना लॉक डाउन मध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच करून सामाजिक बांधीलकी जपली आहे.
ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी संगणक साक्षर असला पाहिजे या साठी प्रशिक्षण देऊन विद्यार्थी आजच्या युगात आणला आहे.
संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शालेय समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मंडळ यांनी ग्लोबल फौंडेशनचे व्यवस्थापक व सहकारी यांचे आभार व्यक्त केले.
जिल्ह्यातील विविध क्षेत्रातुन ग्लोबल फौंडेशनचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

