कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 दीपक केसरकर यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे ; ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचे आवाहन..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी दि.१२:-* शिवसैनिकांच्या बळावर दोन वेळा आमदार झालेल्या दीपक केसरकर यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आवाहन ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिले आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचा प्रथम केसरकर यांनी अभ्यास करावा आणि नंतरच बोलावे तसेच सतत ते भाषा बदलत असतात त्यामुळे त्यांना भाषा मंत्री केले असावे असा टोला आहे राऊळ यांनी हाणला.

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या सावंतवाडी येथील मेळाव्यात उद्धव ठाकरे व आदीत्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषद घेऊन केसरकर यांच्यावर शरसंधान केले.

यावेळी ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार व जिल्हा परिषद माजी सदस्य मायकल डिसोजा उपस्थित होते.

 

राऊळ म्हणाले, सावंतवाडी मध्ये मिंदे गटाची सभा झाली. यावेळी गद्दारी करणाऱ्या मिंदे गटाला पन्नास खोके ही टीका झोंबत आहे.

त्यामुळे केसरकर यांनी ठाकरे आणि शिवसेना नेत्यावर खोटे आरोप केले आहेत. सावंतवाडीतील जनता केसरकर वारंवार खोटे बोलण्यात माहिर असल्याचे ओळखले आहे. त्यांचा खोटे बोलण्यात कोणी हात धरू शकत नाही म्हणून त्यांना भाषा मंत्रिपद मिळाले आहे त्यांना शिक्षण व भाषा मंत्री पद का दिले हे लोकांना आता कळून चुकले आहे ते क्षणाक्षणाला आपली भाषा बदलतात एवढे ते खोटारडे आहेत.

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी शिवसेना आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम अभ्यास करावा. या कुटुंबाने महाराष्ट्राला किंवा देशाला काय दिले हे समजून घ्यावे असे आवाहन रुपेश राऊळ यांनी केले. सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संघटना बांधणी केली. तर ३२ व्या वर्षी आदित्य ठाकरे नेतृत्व करत असतील तर त्याचे स्वागत करायचे सोडून केसरकर टीका करत आहेत. आदित्य ठाकरे यांच्यामध्ये ठाकरे कुटुंबीयांचे रक्त आहे त्यांनी वीस व्या वर्षी देखील नेतृत्व सांभाळले असते तरी ते यशस्वी झाले असते असे राऊळ म्हणाले.

केसरकर यांना शिवसेना समजली नाही असे त्यांनी सांगताना आपण प्रॉपर्टी विकून शिवसेना वाढवली असे म्हणणाऱ्या केसरकर यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना २०१४ ते १९ या कालावधीत नेतृत्व दिले केसरकर मातोश्रीवर गेले तेव्हा त्यांना दरवाजापर्यंत सोडण्यासाठी उद्धव ठाकरे व रश्मी वहिनी आल्या. आपले घरातले मानले त्यांच्या विरोधात केसरकर ओकत आहेत. जनाची नाही तर मनाची तरी त्यांनी ठेवावी. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक,सन २०१९ नगराध्यक्ष पदाची बाबू कुडतरकर निवडणुकी मध्ये विजयी करू शकले नाहीत आणि खोके दिल्याची भाषा करून लोकांचे मनोरंजन करत आहेत. गांधी चौकातील सभेत उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांना काय शब्द दिला होता हे त्यांनी आत्मचिंतन करावे. खरी शिवसेना लालची केसरकर यांना समजली नाही त्यामुळे ते भाषा बदलत आहेत, असे ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळेच केसरकर निवडून आले आहेत त्यांनी संजय राऊत यांना राजीनामा द्या म्हणून सांगण्यापेक्षा स्वतः राजीनामा द्यावा. खोके आणि बोके हे काय आहे ते केसरकर यांनी पहावे. पण खोके घेतले नाही तर त्यांना झोंबते कशाला ? असा प्रतिप्रश्न राऊळ यांनी केला. केसरकर यांची निवडून येण्याची पात्रता नसल्याने आमदार नितेश राणे यांनी त्यांना अप्रत्यक्ष निवडून आणू अशी जाहीर केले आहे. केसरकर खोटे वातावरण निर्माण करण्यास माहीर आहेत. त्यामुळे येत्या २०२४ मध्ये निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचि जनता पाडाव करेल. भाषा बदलणारे केसरकर यांना भाषा मंत्री केले आहे त्यामुळे त्यांचा सर्वत्र हसा होत आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे,त्यांचे सुपुत्र यांच्या विरोधात केसरकर काय काय बोललेत ते जनतेला माहित आहे. मात्र आज भाषा बदलत असलेतरी जनतेच्या दरबारात थारा मिळणार नाही, असे राऊळ यांनी सांगितले. ते म्हणाले,आमदार दीपक केसरकर यांनी आपण प्रॉपर्टी विकून सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना वाढवली असे म्हटले आहे. मात्र सन २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्रात ४३ ते ४४ कोटी उत्पन्न दाखविले होते तर २०१९ च्या निवडणुकीत उत्पन्न दामदुप्पट होवून ते ८८ कोटी झाले आहे. ही प्रॉपर्टी कुठून आली,असा प्रश्न जनतेला पडला आहे असे राऊळ यांनी सांगितले.

उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी दीपक केसरकर यांच्या जोरदार प्रहार केला. यापूर्वी गावागावात पैसे न देणारे केसरकर आता देणगी वाटप करत आहे ते पैसे कुठून आलेत हे लोकांनी शोधले पाहिजेत. गद्दार केसरकर यांनी वारंवार शिवसेना आणि ठाकरे यांच्यावर टीका केली तर लोक त्यांच्या मागे लागतील असा इशारा दिला.

यावेळी मायकल डिसोजा म्हणाले, केसरकर पोपटाच्या गोष्टी सांगायचे ते केसरकर आता भाषा मंत्री झाल्याने शब्द बदलत आहेत ते केव्हा तरी जिल्ह्यात पर्यटनासाठी येत आहे केसरकर यांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांना त्यांना त्यांनी संपवले आहे.ते करेक्ट कार्यक्रम करतात.त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आता दीपक केसरकर यांना निवडून आणायची भाषा केली आहे. त्यामुळे नितेश राणे यांचा नंबर लागतो. कणकवली मध्ये आता सतीश सावंत यांना फायदा होईल असे ते म्हणाले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!