कणकवली येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर धडक
प्रतिनिधी:- रविकांत जाधव
कणकवली:२०- वीज बिल माफ करण्यासाठी आज कणकवली भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरण च्या कार्यालयावर धडक देण्यात आली.वाढीव वीज बिलामुळे सामान्य जनतेचा सुरू असलेला छळ थांबवा अशी मागणी करत भाजपा पदाधिकाऱ्यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.यावेळी ठाकरे सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.वाढीव वीजबिल माफ नकेल्यास आणखीन तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी तालुका अध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके यांनी दिला.दरम्यान आंदोलन करणाऱ्या पादाधिकाऱ्यांना महावीतर कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर पोलिसांनी अडविले त्यानंतर कार्यकारी आभियंता मोहिते यांनी प्रवेशद्वारावर येऊन निवेदन स्वीकारले.
यावेळी तालुका अध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके यांच्या सह जिल्हा पदाधिकारी राजश्री धुमाळे,तालुका उपाध्यक्ष बबलू सावंत, महेश गुरव,शहर अध्यक्ष अण्णा कोदे, महिला अध्यक्ष हर्षदा वाळके,युवक अध्यक्ष नितीन पाडावे,गणेश तळवकर जिल्ह्य सरचिटणीस संदीप मेस्त्री,पपू पूजरे,विजय इंगळे,विजय चिंदरकर,पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, राजू पेडणेकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी “अशा सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय…”,भरमसाठ विजबिले देणाऱ्या ठाकरे सरकार हाय हाय..,ठाकरे सारकाचा निषेध निषेध…अशा घोषणा देणात आल्या.याच वेळी मोठा पोलीस बंदोबस्त का ठरवला.आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत.ही ठाकरे सरकारची दडपशाही चालली असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.दरम्यान पोलीस उपनिरीक्षक बापू खरात,श्री.चव्हाण यांनी आंदोलकांना समजावत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला बंदोबस्त असल्याचे सांगितले.
१०डिसेंबर रोजी होणार कणकवली तालुका ग्राहक मेळावा
कणकवली तालुक्यातील ग्राहक मेळावा घेण्याचे यापूर्वी ठरले होते मात्र तो घेतला नाही त्यामुळे अनेकांच्या प्रश्नचि उत्तरे मिळालेली नाही.हा मेळावा लवकरात लवकर घ्या आम्ही सहकार्य करतो आहेत मात्र वीज बिल भरण्यासाठी सक्ती केलात तर परिणाम चांगले होणार नाही.त्यानंतर १० डिसेंबर रोजी कणकवली तालुक्याचा मेळावा घेण्याचे यावेळी कार्यकारी अधिकारी मोहिते यांनी सांगितले.

