मनोरंजनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा शहराने दिवाळीतही किल्ले बनविण्याची परंपरा जोपासली..

प्रतिनिधी – राकेश परब

बांदा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव असल्याने बऱ्याच सणाच्या उत्साहात विर्जन पडले आहे. मातीचे किल्ले बनविणे हा बांदा शहर आणि दिवाळी सणाचे एक वेगळेच नाते आहे, गेले कित्येक वर्षी पासून बांदा शहरात वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक कील्ले बनवण्यासाठी शहरात स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. लहान मुले काही मित्र मंडळ यांनी सध्या अशा प्रकारचे कील्ले बनवण्यात आले आहे. . जसे महाराष्ट्रात कील्ले प्रत्यक्षात बनवण्यात आले आहेत तशीच हुबेहूब प्रतिकुती ही छोट्या मुलांनी व मंडळांनी खुप मेहनत घेऊन बनविले आहे. या कील्ल्यामध्ये सर्व प्रकारची साम्रगी बसवण्यात येत आहे. यावर आकर्षक लाईट व्यवस्था केली आहे. अशा प्रकारचे सुबक कील्ले बनवण्याची जणु एक स्पर्धाच या मुलांमध्ये होत आहे. मात्र कोरोनाचा काळ असल्याने ह्यावर्षी स्पर्धा नसल्यातच जमा आहे मात्र स्पर्धा असो की नको अशा प्रकारे कील्ले बनवण्यात बांदा शहरात ठिकठीकाणी पाहण्यास मिळत आहे. गेले पंधरा ते वीस दिवस किल्ला बनविण्यास वेळ लागत असल्याचे बांद्यातील काही मुलांच्या ग्रुप मधून सांगण्यात आले. अशाप्रकारे बांदा शहरात छान हुबेहुब कील्ले बनवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!