🟥 हेळेकर सुपर लीग पर्व 1 संपन्न..
*🟥 शिवशक्ती माजगाव संघ विजेता तर महापुरुष माजगाव संघ उपविजेता..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-०५:-* हेळेकर महापुरुष कला क्रीडा मंडळ माजगाव भटवाडी आयोजित हेळेकर सुपर लीग पर्व 1 दिनांक 4 व 5 मार्च रोजी माजगाव भटवाडी येथील ग्रीन पार्क मैदानावर पार पडली. स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम रुपये 20 हजार व चषक तर उपविजेते साठी 15 हजर व चषक इतर आकर्षक बक्षिसे होती. स्पर्धेचा महाविजेता ठरला शिवशक्ती माजगाव संघ तर उपविजेते ठरला महापुरुष माजगाव संघ.. बक्षीस वितरण समारंभासाठी सरपंच ग्रामपंचायत माजगाव च्या अर्चना सावंत मॅडम, ग्रामपंचायत सदस्य उर्मिला मोर्ये, आर के सावंत सर त्याचप्रमाणे भटवाडी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

