🟥 वेळागरवाडी आरोग्य शिबीरात १८२ रुग्णांची मोफत तपासणी..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि-०२:-* सामाजिक, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात जयप्रकाश चमणकर यांनी केलेलं कार्य कौतुकास्पद असुन नवीन पीढीला ते नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
असे प्रतिपादन शिरोडा वेळागरवाडी येथे वेळागर सर्वे न.३९ नागरिक, जनसेवा प्रतिष्ठान व मातोश्री ट्रस्ट तर्फे सामाजिक कार्यकर्ते मा. जयप्रकाश चमणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने कै.स्मिता जयप्रकाश चमणकर यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीफळ वाढवून जेष्ठ नागरिक समिर भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उभादांडा सरपंच निलेश चमणकर, बस्तान अल्फान्सो, निल्सन सोज, संतोष भगत, शाम भगत, शेखर भगत, सुधीर भगत,विशाल दुखंडे,उदय भगत,रुपेश तारी, आब्रास मेनास, जेम्स फर्नांडिस,अमोल ठोंबरे, पेद्रु फर्नांडिस, उत्तैज परब, प्रकाश भगत, आग्नैल सोज आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्य शिबिरात उपस्थित डॉ.संजीव लिंगवत, डॉ.शिवाजी चव्हाण, डॉ.सई लिंगवत, डॉ.संदीप मेश्राम, डॉ. कुमुद मेश्राम यांनी १८२ रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी सामंत, संजय चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.

