मळगाव ब्रिजच्या खाली पुण्यातील गाडीची मॅजिक ला धडक प्रकरण हात घाईवर
मळगाव ब्रिजच्या खाली पुण्यातील गाडीची मॅजिक ला धडक प्रकरण हात घाई वर
पुण्यातील त्या गाडीच्या लोकांनी केली सहा सीटर चालकाला व ग्रामस्थांना मारहाण
ग्रामस्थांचे प्रचंड गर्दी दंगल नियंत्रक पथकही दाखल
मळगाव ब्रिजच्या खाली पुणे येथील चार चाकी गाडी चालकाने शिवशाही नाव असलेल्या मॅजिक ला धडक दिली व बळाचा वापर करून मॅजिक चालकाला मारहाण केली यावेळी गावातील लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही या लोकांनी चोप दिला म्हणून वातावरण संतप्त झाले.
हा हा म्हणता ही वार्ता गावात पसरली व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतला व पोलिसांना पाचारण करण्यात आले,याबाबत माहिती अशी की पुणे पिंपरी चिंचवड येथील चार चाकी वाहन चालक मळगाव हाय वे च्या खालून कुडाळ येथे जात असताना पुलाच्या खाली त्याने सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही सहा सीटर ला धडक दिली त्यावेळी याचा जाब विचारला म्हणून त्याचा राग अनावर झाल्याने त्याने व गाडीतील व इतरांनी मिळून त्या शिवशाही सहा सीटर चालकाला चोपले ग्रामस्थांनी यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या लोकांनाही मारहाण केली, ही वार्ता गावात पसरतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रकरण आपल्या हाताबाहेर जाते असे दिसताच आपल्या राजकीय ओळखीचा फायदा घेत पोलिसांना कळविण्यात आले,व दंगल पथकही त्या ठिकाणी त्वरित आले व परिस्थितीवर ताबा मिळविल.

