🟥 सिंधुदुर्गातील दांपत्य पोहचले चला हवा येऊ द्या च्या मंचावर
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-२६:-* सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात हल्लीची तरुण पिढी नवनवीन प्रयोग करू पाहत आहे. सिंधुदुर्ग मधील शिरिष गवस आणि पूजा गांवकर-गवस असेच एक जोडपे याच उद्देशाने आपले मुंबईतले चालू करिअर सोडून वर्षभरापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी स्थायिक झाले आणि त्यांनी यु ट्यूब आणि इंस्टाग्राम वर रेड सॉईल स्टोरीज (“Red Soil Stories” ) नावाचे चॅनेल सुरू केले.
कोकणातील तसेच आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनशैली, येथील खाद्यसंस्कृती, येथील निसर्ग आणि जैवविविधता एका कलात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडत आहेत . हे सुंदर चॅनेल महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता जगभरातल्या 40 पेक्षा जास्त देशामध्ये सध्या पाहिले जात आहे.
त्यांच्या याच कामाची दखल झी मराठी या नामांकित वाहिनीने घेत, चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. शिरीष आणि पूजा वर चित्रित झालेला हा भाग सोमवार व मंगळवार दिनांक 27 आणि 28 फेब्रुवारी ला रात्री ९.३० ते १०.३० वाजता झी मराठी वर प्रदर्शित होणार आहे. यात पूजा आणि शिरिष यांच्या सोबत लोकप्रिय शेफ विष्णू मनोहर, मधुरा रेसिपी फेम मधुरा बाचल, अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, शेफ अर्चना आर्ते, शेफ स्मिता देव अशा नामांकित पाहुण्यांनी सहभाग घेतला आहे.
या आधी पूजा ही फिल्म इंडस्ट्री मध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत होती तर शिरिष हा फार्मा इंडस्ट्रीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता .
आपल्या मातीसाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा या ध्येयाने आपल्या चालू करिअरला तिलांजली देत ग्रामीण भागातील शाश्वत जीवनशैली जगासमोर मांडून हे दांपत्य एक नवीन आदर्श सर्वांसमोर ठरत आहे.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

