आपत्कालीनमुंबईवैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत प्रा.रमाकांत यादव यांचे निधन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१९: आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत, सिध्दार्थ महाविदयाल मुंबईचे माजी उपप्राचार्य, वैभववाडी तालुक्यातील कुसूर गावचे सूपुञ प्रा. रमाकांत रामचंद्र यादव यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी मुंबई येथे बुधवारी सकाळी ११ वा. निधन झाले आहे.

शैक्षणिक क्षेञाबरोबरच प्रा. रमाकांत यादव यांनी विदयार्थी दक्षेपासूनच आंबेडकरी चळवळीत स्वतःला झोकून दिले होते. बौध्दजन पंचायत समिती मुंबई या संघटनेचे सरचिटणीस, कार्याध्यक्ष, सभापती अशी महत्वाची जबाबदारीची पदे भूषविली आहेत. वैभववाडी तालुका बौध्दसेवा संघाचे मार्गदर्शक म्हणून काम पहात होते.१९३८ साली डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कणकवली येथे घेतलेल्या परिषदेचा सुर्वणमहोत्सव त्यांच्या पुढाकाराने १९८८ ला साजरा करण्यात आला.

राजकीय क्षेत्रात काम करतांना त्यांनी रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडीया या पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्षपद अनेक वर्षे यशस्वीपणे संभाळले.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना सामाजिक उत्थान पुरस्का, जस्टीस आॕफ पीस असे  पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तर अनेक संस्था संघटनानी त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानीत केले होते.

महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय समिती व मुंबई विदयापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम करुन आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत नेता हरपला आहे. त्यांच्या निधनाबदृल तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

*_🪔आता दिवाळीच्या मुहूर्तावर🎊फक्त १ रुपया द्या! आणि नवीन फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन घेऊन जा! तिही बजाज फायनान्सच्या 0% व्याज दरासह!💰_*

*🔥बिजली इलेक्ट्रॉनिक्स सावंतवाडी🔥*

*_🤷🏻‍♂️घेऊन आले आहेत!दिवाळी निमित्त कोणत्याही खरेदीवर आकर्षक भेटवस्तू अगदी मोफत!🎁_*

*💥🔥आमचा दिवाळी धमाका🔥💥*
💫एलईडी टीव्हीच्या खरेदीवर 4.1 होम थिएटर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद टीव्हीवर 5000/- ते 10,000/- पर्यंत सूट..
💫फ्रीजच्या खरेदिवर कुलर किंवा मिक्सर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद फ्रिजवर 5000/- ते 7000/- पर्यंत सूट..
💫एसीच्या खरेदीवर 30% सूट..
💫बजाज फायनान्स कडून सुलभ हप्त्याची कर्ज सुविधा तिसुद्धा 0% व्याज दरात..

_*🌈टीप:* (अटी-शर्ती लागू, ऑफर ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मर्यादीत)_

*🏬आमचा पत्ता:*
लतालॉज कॉर्नर, मुख्य बाजारपेठ-मेन रोड, हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी.
*_📱9422055122_*
*_📱8983805122_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!