कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कणकवलीत शिवजयंती उत्सव समितीच्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

 

*🟥 भव्य चारचाकी रॅली व आश्रमांना जीवनावश्यक वस्तूवाटप*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२१ :-* छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडले. यावेळी काढण्यात आलेल्या चारचाकी रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आश्रमांना त्यांच्या मागणीनुसार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. शिवाजी महाराजांनी सामाजिक बांधिलकीची शिकवण दिली. महाराजांचे विचार जपण्याचा प्रयत्न आम्ही सदोदीत करत राहू असे प्रतिपादन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव प्रताप भोसले यांनी केले.

 

*भव्य चारचाकी रॅली*

शिवजयंतीनिमित्त समितीतर्फे चारचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा प्रारंभ वरवडे येथे स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कान्हा मालंडकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी वरवडे सरपंच करूणा घाडीगांवकर, बिडवाडी सरपंच सौ. पूजा चव्हाण, पिसेकामते सरपंच सौ. प्राजक्ता मुद्राळे, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे आदी उपस्थित होते. रॅलीचे कलमठ बाजारपेठ येथे आयोजित शिवजयंती उत्सवठिकाणी सुशांत राऊळ, नितीन पेडणेकर, आबा मेस्त्री, सचिन पेडणेकर, नीतेश भोगले आदींनी स्वागत केले. आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे आयोजित शिवजयंती उत्सवस्थळी भेट देण्यात आली. शिवाजीनगर येथील शिवजयंती उत्सवात राजू वर्णे व शिवभक्तांनी रॅलीचे स्वागत केले. शिवाजी महाराज मित्रमंडळ चौक येथे अनंत पारकर, मयूर खुटाळे आदींनी रॅलीचे स्वागत केले. सकल मराठा समाज आयोजित शिवजयंती उत्सवास भेट देण्यात आली, तेथे सुशील सावंत, बच्चू प्रभूगांवकर, बबलू सावंत आदींनी स्वागत केले व रॅलीचा समारोप झाला.

 

*आश्रमांना जीवनावश्यक वस्तूवाटप*

रॅलीनंतर असलदे येथील दिवीजा वृद्धाश्रम व पणदूर येथील संविताश्रम या दोन्ही आश्रमांना भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शिवजयंती उत्सव समितीने शिवाजी महाराज यांनी दिलेली सामाजिक बांधिलकीची शिकवण जपली असल्याचे कौतुकोद्गार संविताश्रमाचे प्रमुख संदीप परब यांनी काढले. तर शिवजयंती उत्सव समितीने जपलेल्या सामाजिकतेचा आदर्श अन्य मंडळांनीही घ्यायला हवा, असे उद्गार दिवीजा वृद्धाश्रमाच्या प्रमुख दीपिका रांबाडे यांनी काढले .

 

*शिवभक्तांची मोठी गर्दी*

समितीतर्फे ग्रामीण कासरल, कसवण, बिडवाडी येथे शिवजयंती उत्सवांना भेटीही देण्यात आल्या. दिवसभराच्या उपक्रमांमध्ये संजय साळसकर, माजी उपसरपंच आनंद साटम, अजिंक्य लाड, बाबू राऊळ, पप्पू पुजारे, अमित पवार, शैलेश जाधव, बाळा सावंत, आनंद घाडीगांवकर, अमोल घाडीगांवकर, संदीप घाडीगांवकर, सुभाष मालंडकर, अर्चित कदम, समीर कदम, ग्रा. पं. सदस्य प्रदीप कदम, राज सावंत, शेखर रावराणे, पुरुषोत्तम लाड, बाबजी चव्हाण, अभिजीत सावंत, नितीन मुद्राळे, रुपेश नाडकर्णी, यश सावंत, पांडू मेस्त्री, बबन मेस्त्री, सतीश मेस्त्री, समीर देसाई, अपू देसाई, सिजर फर्नांडिस, संकेत राणे, प्रसाद बावकर आदी सहभागी झाले होते.

 

 

*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🤷🏻‍♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी ||जाहिरात*

 

*_🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL_*

 

_*🤷🏻‍♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी* घेऊन आले आहेत खास कर्ज सुविधा_

 

_🤩कर्ज मर्यादा_

_तब्बल *” 1 कोटी”* पर्यंत !_

 

_*💥गरज तुमची…साथ आमची…,आपुलकीची विश्वासाची !*⚡️_

 

⚡️आता मिळवा *कर्ज रु. 1 कोटी* पर्यंत

 

💸आपल्या उदयोग व्यवसायासाठी, फ्लॅट खरेदी, घर बांधणी, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, स्थावर तारण कर्ज

 

_*💸जलद मंजूरी, सुलभ प्रक्रिया*_

 

_💵 EMI रू. 1400/- प्रति लाख_

 

*💸रू. 2 लाख पर्यंत विनातारण कर्ज त्वरीत वितरण*

 

_🔸आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा._

 

*🔸आमचा पत्ता व संपर्क:-*

*कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि., सावंतवाडी*

वसंत प्लाझा, सावंतवाडी

_*शाखा सावंतवाडी*_

📞02363273889

 

 

_*शाखा वेंगुर्ला*_

📞02366262953

_*शखा कणकवली*_

📞02367233922

_*शाखा कुडाळ*_

📞02362221559

_*शाखा शिरोडा*_

📞02366227439

_*शाखा मालवण*_

📞02365252782

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!