अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करायची व व्यावसायिकांच्या सोबत असल्याचे सांगायचे..
▪️नगराध्यक्षांचे ओठात एक आणि पोटात एक असल्याचे वर्तन; सुधीर शिंदे
▪️जिल्हाधिकारी यांच्याकडून अपेक्षित सहकार्य नसल्याने मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे शिंदे तक्रार करणार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.१९: जिल्हाधिकारी यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबाबत लवकरच महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे जिल्हाधिकारी व प्रशासनाविरोधात दाद मागणार असल्याचे सांगून, नगराध्यक्षाच्या मनमानी कारभाराविरुद्ध महाविकास आघाडीने त्यांना बडतर्फ करण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे, अशी माहिती चिपळूण नगरपालिका, काँग्रेसचे गटनेते तथा बांधकाम सभापती सुधीर शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, कोरोना संकट काळात अत्यंत हालाकीत दिवस काढणाऱ्या लहान मोठ्या व्यावसायिकांनी आता कुठे पोट भरायचे प्रयत्न सुरू केले होते. त्यांना उठवणीस आणण्याचे काम कोणी केले आहे हे सर्व जनता ओळखून आहे, बांधकाम सभापती म्हणून आपल्याला या कारवाईची साधी मला कल्पनाही देण्यात आली नाही.
नगराध्यक्षांवरील तक्रारी बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून एक महिन्यात न्याय मिळणे अपेक्षीत होते. आम्हाला वेळेत न्याय न मिळता वागणूकही चांगली मिळाली नाही. या बाबत आम्ही काँग्रेसचे नगरसेवक लवकरच महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांना भेटणार आहोत, या सर्व बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून महाविकास आघाडीतील सर्व नगरसेवक राजिनाम्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. बांधकाम सभापती, नगरसेवक सुधीर शिंदे यांनी बुधवारी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी दरम्यान मिळालेल्या वागणुकीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना जिल्हाधिकारी कार्यालयात योग्य वागणूक मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ५५/१ च्या कायद्यानुसार नगराध्यक्ष बडतर्फ प्रकरणाची प्रथम चौकशी होऊन ३० दिवसांत निर्णय लागणे अपेक्षित होते. यामध्ये विलंब होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाकडे मुदत वाढवून घेण्यासाठी मागणी करावी लागते. या प्रकरणाच्या आतापर्यंत तीन सुनावण्या झाल्या आहेत. आम्ही सर्व नगरसेवक गरीब आहोत. रत्नागिरीत सारख्या फेऱ्या मारव्या लागत आहेत.यामध्ये पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होत आहे. शासकीय निर्णयाप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल पाठवणे गरजेचे होते. चौकशी न करता आधी-सुनावणी लावण्यात आली. उगाचच सुनावणीच्या तारखा आणि चौकशीमध्ये दिवस ढकलण्यापेक्षा एकदाच काय तो निर्णय देऊन टाका. आमचे चूक आहे, हे सांगा, नाहीतर बरोबर असेल तर नगराध्यक्षांवर कारवाई करा. आम्हाला तरी कळूदेत आम्ही बरोबर आहोत की चूक. आता हे सर्व असह्य झाले आहे. त्यामुळे या विरोधात आपण महसूलमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे गुरूवारी तक्रार करणार आहे. नगराध्यक्षा खेराडे या आपल्याला बहिणीसमान आहेत. परंतु राजकीय क्षेत्रात त्या आपल्या विरोधक आहेत. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी विकास थांबवण्याचे कोणतेही काम केलेले नाही. मात्र, जनतेच्या पैशाचा गैरवापर होणार असेल तर बोलायचे नाही काय? असा सवाल केला. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सहा कोटी रुपयात होत असताना साडे नऊ कोटी रुपये कसे बिल होते. यासाठी आवाज उठवायचा नाही काय? सांस्कृतिक केंद्र सुरू होण्यासाठी नगराध्यक्षांनी दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नये. इंदिरा गांधी केंद्रसुरू व्हावे ही सर्वांची इच्छा आहे मात्र सत्ताधाऱ्यांनी ते का सुरु करून दाखवले नाही हे सांगावे. नगरसेवक विजय चितळे आम्हाला राष्ट्रीय नेते म्हणतात. परंतु चितळे यांना नगराध्यक्षा विश्वासात घेतात का? हे आधी पाहावे. भाजपाचे उपनगराध्यक्ष अनेक बैठकांना उपस्थित नसतात. याची कारणे यांनी शोधावी. भाजपाला पाठिंबा देणाऱ्या सीमा रानडे आता महाविकास आघाडीबरोबर आल्या आहेत. त्या आघाडीबरोबर का आल्या याचे उत्तर द्यावे आणि भाजपाने आधी आत्मपरीक्षण करावे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
या वेळी नगरसेविका संजीवनी शिगवण,सफा गोठे ,अक्षय केदारी आदी उपस्थित होते.
*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*
आता *ऑनलाईन🌎* पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃
*📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*
_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_ *BAJAJ FINANCE⚡* _आणि_ *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_ *0%💫* _व्याजदरासह…!_🤩
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*
*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी
*📲संपर्क : 7719918722*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_