* दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल युथ क्लायमेट कॉन्क्लेव्ह 2023 साठी महाराष्ट्रातून ऐश्वर्य मांजरेकर व मेगल डिसोजा यांची निवड
*🟥 भारतातून १२० युवकांची निवड..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-१९ :-* हवामान बदलाचा मुकाबला करण्यात तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे,पृथ्वीचे हवामान नेहमीच बदलत असते. यातील काही बदल नैसर्गिक कारणांमुळे झाले आहेत जसे की ज्वालामुखीचा उद्रेक, पूर, जंगलातील आग इत्यादी, परंतु त्यापैकी काही मानवी क्रियाकलापांमुळे आहेत. जंगलतोड, जीवाश्म इंधन जाळणे, पशुधन , शेती इत्यादी मानवी क्रियाकलापमुळे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू निर्माण करतात. याचा परिणाम ग्रीनहाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वार्मिंगमध्ये होतो जे हवामान बदलाचे प्रमुख कारण आहेत. नॅशनल युथ क्लायमेट कॉन्क्लेव्ह
ची प्राथमिक भूमिका म्हणजे भारतीय तरुणांना हवामान बदलाच्या मुद्द्यांवर विज्ञान आधारित चर्चेत सकारात्मकतेने आणि सक्रिय मार्गाने सहभागी करून घेणे आणि हवामानाच्या पूर्ततेसाठी भारतातले तरूण व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदलावर काम करणे हे आहे. युरोपियन युनियन व भारत सरकारच्या नेतृत्वात सदर क्लायमेट कॉन्क्लेव्ह होत असून युनिसेफ, GIZ, TERI आणि CEEW , Yuwaah व पर्यावरण व वन मंत्रालय आणि हवामान बदल नोडल मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही परीषद पार पडणार आहे. या वर्षी भारत G20 चा अध्यक्ष आहे, त्या दृष्टीनेही ही परीषद महत्वाची मानली जात आहे. YCC कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय तरुणांमध्ये वातावरण बदल , हवामान , व पर्यावरण वाचवण्याबाबत गंभीर विचार, सर्जनशीलता, वैज्ञानिक समज, संवाद, सहयोग, बहुभाषिकता, समस्या सोडवणे, नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि डिजिटल साक्षरतेने मजबूत करणे हा आहे. या परिषदेमध्ये जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2023 च्या शाश्वत जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या युवा समारंभात सादर केलेल्या ‘युवा प्रतिज्ञा’चा मसुदा तयार करण्याची संधीही तरुणांना मिळेल. उच्च-स्तरीय वक्ते, तरुणांच्या चर्चा आणि मुलाखती, व्हिडिओ संदेश, प्रश्नमंजुषा , एज्युकेशनल फिल्ड ट्रीप , COP 27, G20, Y20 यांची इत्यंभूत महिती इत्यादींसह अनेक कार्यक्रम या परिषदेमध्ये समाविष्ट आहे.
नॅशनल युथ क्लायमेट कॉन्क्लेव्ह 2023 साठी संपूर्ण भारतातून अर्ज मागविण्यात आले होते त्या पैकी 120 तरुणांची निवड करण्यात आली या मध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युथ बिट्स फॉर क्लायमेटस ग्रुप ची संस्थापिका मेगल मार्शेलिन डिसोझा व ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांची निवड नॅशनल युथ क्लायमेट कॉन्क्लेव्ह 2023 साठी झाली असून सदर क्लायमेट कॉन्क्लेव्ह 19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2023 रोजी दिल्ली येथे विश्व युवक केंद्र चाणक्य पुरी व सिल्व्हर ओक इंडिया हॅबिटेट सेंटर येथे होणार आहे.

