कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सप्तरंग कलामंच होडावडा दशक पुर्ती सांस्कृतिक महोत्सव थाटात संपन्न..

 

*🟥 गावच्या विकासात सप्तरंग कलामंच होडावडा चा हातभार मोलाचा ; जनार्दन शेट्ये सामाजिक कार्यकर्ते*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१५:-* होडावडे गावातील सप्तरंग कलामंच होडावडा हे मंडळ विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक उपक्रम राबवून गावच्या विकासात मोलाची कामगिरी बजावत आहे .सप्तरंग कलामंच होडावडा हे गावच्या विकासासाठी झटणारे आदर्श वंत मंडळ आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शेट्ये यांनी होडावडे येथील सप्तरंग कलामंचाच्या दशक वर्ष पूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले.

होडावडे गावातील सप्तरंग कलामंच होडावडा यास दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी केले होते .सप्तरंग कलामंच होडावडा ने संत गोरा कुंभार या नाट्यप्रयोगाचे जवळपास 24 नाटय प्रयोग केले आहे. तसेच विविध उपक्रम या मंडळामार्फत गावात राबवले जातात यावर्षी दशक पूर्ती सोहळ्यानिमित्त खास गावातील महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर, तसेच विवध करमणूकीचे कार्यक्रम आयोजीत केले होते तर अद्वैत क्रियेशन निर्मित कलांकुर ग्रुप मालवण प्रस्तुत धम्माल विनोदी नाटक ‘प्रेमाचा झांगडगुत्ता’ हा नाटय प्रयोग आयोजीत केला होता. त्याला रसिकवर्ग यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शेट्टये, जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, बाळासाहेब शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख श्री नितीन मांजरेकर ,उपतालुकाप्रमुख श्री देवा कांबळी, होडावडे सरपंच सौ.रसिका केळुसकर, सदस्य श्री अरविंद नाईक होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई माजी सचिव विठ्ठल मेस्त्री, काजू उद्योजक श्री प्रकाश शेटकर ,श्रीम. श्रेया पै ग्रामपंचायत सदस्य सौ.अमृता साळगावकर, श्री रामचंद कुडाळकर,सप्तरंग कलामंच होडावडे चे अध्यक्ष, तसेच सप्तरंग कलामंच होडावडे मंडळ चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मान्यवर यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. नारायण परब यांनी केले. तर आभार प्रदर्शन होडावडे सप्तरंग कलामंचाचे अध्यक्ष रामकृष्ण मेस्त्री तर प्रास्ताविक उमेश पावणोजी यांनी केले.

 

फोटो

होडावडे येथील सप्तरंग कलामंचाच्या दशक वर्ष पूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन करतांना सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शेट्टये, जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, बाळासाहेब शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख श्री नितीन मांजरेकर ,उपतालुकाप्रमुख श्री देवा कांबळी, होडावडे सरपंच सौ.रसिका केळुसकर, सदस्य श्री अरविंद नाईक होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई माजी सचिव विठ्ठल मेस्त्री, काजू उद्योजक श्री प्रकाश शेटकर ,श्रीम. श्रेया पै ग्रामपंचायत सदस्य सौ.अमृता साळगावकर, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!