कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 एस्.एन्. देसाई चौक येथे आंदोलन करताना राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिक

 

*🟥 कुडाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोनाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी*  

*🟥 लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कठोर कायदे करण्यासह वक्फ कायदा रहित करा* 

*🎥 Kokan Live Breaking News*

_*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*_

 *🎴कुडाळ, दि-१२:-* आज लव्ह जिहाद दाराशी येऊन ठेपला आहे. श्रद्धा वालकरच्या मारेकरी आबताफला अद्यापपर्यंत फाशी दिली जात नाही. लव जिहाद हे एक जिल्हा किंवा एका राज्यापुरते मर्यादित नसून ते एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील छड्यंत्र आहे. लव जिहाद म्हणजे काय आहे ते प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या, प्रत्येक हिंदू युवतीच्या मनापर्यंत पोहचले पाहिजे. लव जिहादच्या विरोधात कठोर कायदा झाला पाहिजे. धर्मांतर विरोधी राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही धर्मांतर विरोधी कठोर कायदे करावेत, तसेच वक्फ बोर्डचा कायदा रहित करावा, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदु आंदोलनाच्या अंतर्गत कुडाळ येथे आंदोलन करण्यात आले. याविषयीचे निवेदन लवकरच प्रशासनाला देण्यात येणार आहे.

कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयासमोरील एस्.एन्. देसाई चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. या वेळी बोलताना रणरागिणी शाखेच्या कु. प्राची शिंत्रे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात महिलांना त्रास देणार्‍यांचा चौरंग्या केला जात होता; मात्र आज श्रद्धा वालकरची हत्या होऊन अद्याप आरोपीला शिक्षा झाली नाही. लव जिहादच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक हिंदु युवती आणि महिला यांचे बळी गेले आणखी किती हिंदू युवतींचे बळी जाऊ देणार आहोत ?

या वेळी बोलताना हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी सांगितले की, आज उत्तरप्रदेश , मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, ओडीसा या राज्यात धर्मांतर बंदी कायदा आहे . गोवा राज्यातही हा कायदा होऊ घातला आहे. महाराष्ट्रातही हा कायदा व्हावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आपण करत आहोत .

हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर म्हणाले की, आज आपण हिंदू समाज ८० टक्के असुनही मुठभर लोक आपल्यावर वर्चस्व गासवत आहेत. लव जिहाद, धर्मांतर यांच्या माध्यमातून आपले शोषण केले जात आहे. आपल्याकडे धर्मशिक्षणाची सोय नसल्यानेच अशा घटना वाढत चालल्या आहेत. आज आपण संख्येने अधिक आहोत म्हणून काही परिणाम होणार नाही, अशा भ्रमात हिंदूंनी राहू नये. संघटित होऊन अशा आंदोलनांच्या माध्यमातून एकत्र आले पाहिजे. देशात आज दरवर्षी आठ लाख हिंदूंचे धर्मांतर केले जाते, ही मोठी गंभीर समस्या आहे.

या वेळी समितीचे श्री. राजेंद्र पाटील यांनी हिंदूंच्या धर्मांतराच्या वाढत्या घटनांमुळे हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठीच ही आंदोलने आहेत, असे सांगितले.

या वेळी हिंदूनो आपल्या तरुणी लव्ह जिहादला बळी पडू नये, यासाठी कटीबद्ध व्हा ! धर्मरक्षण करा ! युवतींनो लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकू नका ! वक्फ कायदा रहित करा ! आदी घोषणा देत आणि याविषयीचे विविध फलक हातात धरुन जन प्रबोधन करण्यात आले. या वेळी विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.अदिती तवटे हिने केले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!