महाराष्ट्रराजकीय

🟥 आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात, उदय सामंतांचा गौप्यस्फोट; सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सोलापूर, दि-१२:-* आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.ते माढा (Madha) तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी असेही सामंत म्हणाले. यापुढं येणारे महापालिकेचं मैदान असो लोकसभेचे असो अथवा विधानसभेचे सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

बच्चू कडू यांच्या संपर्कात आघाडीमधील 10 ते 12 आमदार आहेत. तर 8 ते 10 आमदार माझ्या संपर्कात असल्यानं एकूण 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी टेंभूर्णीत केला. यापुढं येणारे महापालिकेचे मैदान असो लोकसभेचे असो अथवा विधानसभेचे सर्व कुस्त्या शिंदे फडणवीस जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टेंभुर्णीत शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी सामंत यांच्यासह ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत उपस्थित होते.

 

वीज तोडणीवर बोला, सामंतांच्या भाषणावेळी उपस्थितांचा गोंधळ

 

टेंभूर्णीतील कुस्ती स्पर्धेसाठी पुणे, सातारा, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील नामांकित मल्ल आले होते. या स्पर्धा पाहण्यासाठी जवळपास 25 हजार कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. मात्र सामंत यांचे भाषण सुरू होताच वीज तोडणीवर बोला असा गोंधळ प्रेक्षकांनी सुरू केला. यावेळी पुरेशा दाबाने वीज पुरवठा केला जाईल असे उद्य सामंत यांनी सांगितले.

 

बच्चू कडूंचा दावा

 

येत्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडीतील 10 ते 15 आमदार भाजप, शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. कोर्टातील प्रलंबीत खटल्यामुळं पक्षप्रवेश लांबत असल्याचे कडू यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील सरकार पडण्याचे काहीही कारण नाही. सरकार बहुमतामध्ये आहे. म्हणजेच 20-25 आमदार इकडे तिकडे झाले तरी, काही फरक पडणार नाही. सरकार आपले कार्यकाळ पूर्ण करेल असेही कडू म्हणाले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!