कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

भाजप व शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा आज सेनेत होणार पक्ष प्रवेश….

भाजप व शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा आज सेनेत होणार पक्ष प्रवेश….

सावंतवाडी, , ता. ११ शिवसेनेत राज्यभरात आऊटगोईंग सुरूअसताना सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात मात्र आज मोठाप क्षप्रवेश घेण्यात येणार आहे.यावेळी भाजप सह शिंदे गटातील प्रमुख व माजी पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात मोठा पेंडॉल उभारण्यात आला आहे. या मेळाव्यात सुमारे ७०० हून अधिक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे. सायंकाळी ५.३० च्या सुमारास होणाऱ्या या मेळाव्याला खासदार विनायक राऊत यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गावातील आजी-माजी पदाधिकारी प्रवेश करतील, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता नेमका कोण? पक्षप्रवेश करतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!