कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कळसुलकर हाय.च्या कु.स्वरांगी खानोलकर व कु.प्रणिता आयरेचा सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-०७:-* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे सावंतवाडीत प्रशालेमार्फत मिरवणूक काढण्यात आली.

कुमारी स्वरांगी संदीप खानोलकर प्रशालेची विद्यार्थिनी 26 जानेवारी गणतंत्र दिवस परेडसाठी दिल्ली येथे निवड झालेली होती.आज तिचे सावंतवाडीत आगमन झाले. याचबरोबर प्रशालेची कु प्रणिता नथुराम आयरे कॅरम खेळातून राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद मिळवले.

सावंतवाडी गवळी तिठा पासून गांधी चौक – जय अंबे चौक मार्गे प्रशालेपर्यंत तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष श्री बबन साळगावकर, दिपक भाई मित्र मंडळ यांच्यामार्फत रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.श्रीमती परब पोलीस कर्मचारी मार्फत तिचे अभिनंदन करण्यात आले. अखिल भारतीय शिक्षक संघ अध्यक्ष श्री म.ल. देसाई, केंद प्रमुख श्रीम लंगवे मॅडम, गौड सारस्वत ब्राम्हण संघटना, आर्यगृहन्वेश वसाहत, अनिल परुळेकर, सेवानिवृत्त सैनिक संघटना सावंतवाडी,श्री शिवाजीराव भिसे व्यायाम शाळेचे श्री सुधीर हळदणकर, सावंतवाडी शाळा नंबर-2 व सावंतवाडी शाळा नंबर-4, आरोग्य भुवन रिक्षा संघटना,शाळा व्यवस्थापन समिती,पालक-शिक्षक संघ, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांकडून या दोघीही विद्यार्थिनींचे शाल,पुष्पगुच्छ,रोख रक्कमा देऊन स्वागत व अभिनंदन केले.

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्रांगणामध्ये या दोन्हीही विद्यार्थिनींचे औक्षण करून स्वागत करण्यात आले व प्रशालेच्या सभागृहामध्ये या दोघीही सत्कार मूर्तींचे भव्य दिव्य असे सत्कार करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागत गीताने मान्यवरांचे सत्कार मूर्तींचे स्वागत करण्यात आले.यावेळेस व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ५८ महाराष्ट्र बटालियन ओरसचे सेना मेडल प्राप्त कर्नल श्री दीपक कुमार दयाल, सुभेदार मेजर श्री गेडाम, सुभेदार मेजर श्री शेडगे, नायब सुभेदार श्री समीर नाईक, हवालदार श्री दिलीप राऊळ, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री शैलेश पई, सचिव डॉ श्री प्रसाद नार्वेकर, सहसचिव श्री गौरंग चिटणीस, खजिनदार श्री मुकुंद वझे, संचालिका सौ राजश्री टिपणीस,सदस्या श्रीम श्रद्धा नाईक, सत्कारमूर्ती कु. स्वरांगी संदीप खानोलकर,आई सौ.स्वप्नजा खानोलकर तसेच कुमारी प्रणिता नथुराम आयरे, प्रणिताची आई सौ.मीनाक्षी आयरे, सावंतवाडी केंद्रप्रमुख लंगवे मॅडम, कळसुलकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन.पी.मानकर, सावंतवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी माननीय श्री जयंत जावडेकर, श्री अनिल भाऊ परुळेकर,ए एन ओ निखिल ओरोसकर सेकंड ऑफिसर कुडाळ हायस्कूल, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, शाळेचे शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग,विद्यार्थी यांकडून दोघीही सिंधुकन्यांचे सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी कु.स्वरांगिने व कु.प्रणिता ने आपले मनोगत व्यक्त केले.

कु.स्वरांगीला प्रशालेचे एनसीसी शिक्षक फर्स्ट ऑफिसर श्री गोपाळ गवस यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.एस यू बांदेलकर यांनी केले तर श्री ए जे ठाकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*

 

🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄

🏵️सुवर्णकार 🏵️

 

*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*

 

*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*

 

💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫

*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰

 

*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰

🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰

 

🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟

*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात‌*💰

 

*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰

🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟

 

🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟

 

🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟

🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟

🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟

🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟

🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟

🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟

🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟

*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*

✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨

*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ

 

*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*

✨प्रोप्रा‌. शामसुंदर मडकईकर✨

 

*📲संपर्क:-*

विराग मडकईकर

📲8411930437

वैष्णवी मडकईकर

📲7796695448

 

🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!