मुख्याध्यापकांच्या कर्तव्यात अडथळा, निर्दोष मुक्तता
🟥
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.०३:* डिगस माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून याच विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ. मूर्ती भास्कर कासार यांची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी निर्दोष मुक्तता केली. सौ. कासार यांच्यावतीने अॅड. अजित भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल मालवणकर यांनी काम पाहिले.सौ. कासार या ३१ ऑगस्ट २०१७ रोजी डिगस माध्यमिक विद्यालयातून सेवानिवृत्त झाल्या होत्या. मात्र त्यांचे सेवानिवृत्ती वेतन अनेक महिने मिळाले नव्हते. कोषागार कार्यालयातून त्यांनी घेतलेल्या माहितीनुसार मुख्याध्यापकांकडून त्यांचे ना देय (नो ऑब्जेक्शन) प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी संबंधित विद्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी सौ. कासार यांनी मुख्याध्यापक श्री. आळवे यांना विद्यालयात जाऊन याबाबत विचारणा केली होती.. यावेळी कागदपत्रे पाठविण्यात आली आहेत, असे सांगण्यात आले. तर बारनिशीपाहून याबाबतची माहिती दिली जात असताना सौ. कासार यांनी आपल्याशी वाद घातला. बारनिशी आपल्यावर फेकून मारली. टेबलावरील वया विस्कटून टाकल्या. त्यावेळी आपल्याला दुखापत झाली तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण झाला, अशी तक्रार मुख्याध्यापक सच्चिदानंद आळवे यांनी दिली. होती. त्यानुसार कुडाळ पोलिसांनी सौ. कासार यांच्यावर भा. दं. वि. कलम ३५३, ३३२, ३२३ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत मूर्ती कासार यांच्याबाबत कोणताही पुरावा न्यायालयासमोर न आल्याने त्यांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_सावंतवाडीतील प्रसिद्ध वडापाववाले 👨🏻🍳 *शेटकर बंधू* पुन्हा एकदा सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध *🍔संजू वडापाव सेंटर👨🏻🍳*_
*🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL*
*☕चहा*
*🧋कॉफी*
*🍔वडापाव*
*🥠समोसा*
*🧇कटलेट*
*🧅कांदा भजी*
*🥔बटाटा भजी*
*🌶️मिर्ची भजी*
*🍲भाजी पाव*
*🍛मिसळ पाव*
*🍗चिकन पाव*
_आणि अन्य बरेच काही उपलब्ध.🥳😍._
*👨🏻🍳आमचा पत्ता:-*
*संजू वडापाव सेंटर*
_दत्त भेलच्या बाजूला, श्री पंचम खेमराज कॉलेज रोड,मोतीतलाव जवळ सावंतवाडी_
*📱संपर्क:-*
9422394123
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

