आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 आत्ता वणव्यांना सुरुवात वन्य प्राणी संकटात

🟥 वनविभागाने वेळीच जागे व्हावे*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०२:-* डिसेंबर महिना संपल्यानंतर बहुतांश ठिकाणी वनवे लागतात उन्हाळा प्रारंभ झाला की जंगलात वनव्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. जंगलात आग लागलेस ती परंपरागत पद्धतीने आटोक्यात आणली जाते. मात्र उन्हाळ्यात जंगलात लागणारी आग ही सर्व बाजूंनी पसरते त्यामुळे काही तासात जंगल आगीने वेढले जाते.

कडक उन्हामुळे डोंगर माळावरचे गवत वाळते त्याचा फायदा घेऊन काही विकृत मनोवृत्तीचे लोक जंगलातील अथवा रस्ताकडे वरील गवत पालापाचोळ्याला आग लावत पेटवून देत वनवे लावतात . त्यामुळे डोंगर व जंगल दऱ्यात वास्तव्यात असलेले वन्य प्राणी होरपळून मृत्यूमुखी पडतात पक्षाचा अधवा जंगलातील वनौषधी नष्ट होत आहेत. त्यामुळे निसर्ग वाचवण्यासाठी वन विभागाला जनजागृती करण्याची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे आज अनेक नैसर्गिक संकटे उभे राहत आहेत. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊ लागली जंगल व मालकीतील महाकाय वृक्ष इतिहास जमा झाले. साग, शिसम, खैर अशा अनेक प्रकारच्या झाडांची संख्या कमीच पाहावयास मिळत आहे. जंगलाच्या संवर्धनासाठी राज्याने व केंद्राने वन विभागामार्फत आजवर राबवलेल्या योजना अयशस्वी झाले आहेत. सध्या जंगलतोड होऊ नये यासाठी कायदे आहेत मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. जंगलमय भागात प्राण्यांची खाद्य असणारी वनस्पती अशा वनव्यात किंवा जंगलतोडीत नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीवरील अतिक्रमण वाढत चालले आहे. यामुळे जंगलाच्या संवर्धनाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सरपणासाठी जंगलतोड होऊ नये यासाठी नागरिकांना मोफत गॅस सिलेंडर कनेक्शन वितरित केले मात्र खरोखरच याचा जंगल तोडीवर परिणाम झाला काय याचा विचार करणे गरजेचे आहे. शासन स्तरावर यासाठी आणखी काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

_सावंतवाडीतील प्रसिद्ध वडापाववाले 👨🏻‍🍳 *शेटकर बंधू* पुन्हा एकदा सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध *🍔संजू वडापाव सेंटर👨🏻‍🍳*_

 

*🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL*

 

*☕चहा*

*🧋कॉफी*

*🍔वडापाव*

*🥠समोसा*

*🧇कटलेट*

*🧅कांदा भजी*

*🥔बटाटा भजी*

*🌶️मिर्ची भजी*

*🍲भाजी पाव*

*🍛मिसळ पाव*

*🍗चिकन पाव*

_आणि अन्य बरेच काही उपलब्ध.🥳😍._

 

*👨🏻‍🍳आमचा पत्ता:-*

*संजू वडापाव सेंटर*

_दत्त भेलच्या बाजूला, श्री पंचम खेमराज कॉलेज रोड,मोतीतलाव जवळ सावंतवाडी_

*📱संपर्क:-*

9422394123

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!