बांदा श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात गणेश जयंती उत्सव उत्साहात
बांदा श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात गणेश जयंती उत्सव उत्साहात
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात
बुधवारी माघी गणेश जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. या सोहळ्या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
पहाटे ५.०० वाजता-काकड आरती, अभिषेक व पुजा,श्री गणेश पूजा,त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा झाली
त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसाद आरंभ झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सायंकाळी सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला.सायं आरती झाल्यानंतर रात्री
सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरा,ता. वेंगुर्ला यांचा
“वक्रतुंड” पौराणिक नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता.
भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा व महाप्रसादाचा् लाभ घेतला.मंदिर व परिसरात,सुंदर रांगोळ्या आकर्षक फुलांची सजावट व नेत्रदिपक रोषणाई करण्यात आली होती.श्री पिंपळेश्वर गणपती मंडळाच्या वतीने सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.

