मोंडकर येथे १ लाख ४२ हजाराचा अवैध गुटखा जप्त
*🟥सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण व देवगड पोलिसांची कारवाई*
*🟥मोंड घाडीवाडी येथील घरावर छापा टाकून कारवाई*
*🟥शासन प्रतिबंधित गुटखा, पान मसाल्याचा साठा केल्याने छापा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 देवगड, दि.२०:* स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गच्या पथकाने मोड घाडीवाडी – येथील महेंद्रन भास्करन तेवर (४२) याच्या घरावर छापा टाकून तब्बल १ लाख ४२ हजार ५६७ रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने देवगड पोलिसांच्या सहकार्याने गुरुवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास केली. याप्रकरणी महेंद्रन तेवर या संशयिताविरुद्ध देवगड पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महेंद्रन तेवर याने आपल्या घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, कॉन्स्टेबल के. ए. केसरकर, रवी इंगळे, पोलीस नाईक एस. एस. खाडये यांच्या पथकाने देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, हवालदार राजन जाधव, एफ. जी. आगा, ए. सी. कदम यांच्या सहकार्याने गुरुवारी सकाळी महेंद्रन तेवर याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात तेवर याच्या घराच्या पडवीत मोकळ्या जागेत किलतानच्या पिशव्यांमध्ये साठवणूक केलेला अवैध गुटखा सापडला.यात २३ हजार ६०० रुपये किंमतीचे प्रिमियम रॉयल दुबई एक्स्पोर्ट क्लॉलिटी गुटख्याचे २३६
पाऊच, ३१ हजार ९२० रुपये
किंमतीचे विमल पानमसाल्याचे २६६ पाऊच, दुसऱ्या पिशवीत ४३ हजार ५६० रुपये किंमतीचे विमल पानमसाल्याचे २२०. पाऊच, तिसऱ्या पिशवीत १५ हजार ६४२ रुपये किंमतीचे विमल पानमसाल्याचे ७९ पाऊच, १० हजार ५६० रुपये किंमतीचे बाजीराव गोल्ड इमेरियन पानमसाल्याचे ८८ पाऊच, २ हजार ६१० रुपये किंमतीचे मस्तानी टोबॅकोचे ८० पाऊच, ६ हजार ४८० रुपये किंमतीचे व्ही- १ टोबॅकोचे २१६ पाऊच, ५ हजार ४०० रुपये किंमतीचे महक सिल्व्हर पानमसाल्याचे ४५ पाऊच, १ हजार ३५ रुपये किंमतीचे एम-१ जर्दाचे ४६ पाऊच, १ हजार ७६० रुपये किंमतीचे व्ही- १ तंबाखूचे ८० पाऊच सापडले. हा सर्व गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणाची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून संशयिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

