कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

असनिये सरपंच उपसरपंचासहीत सदस्य बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

असनिये सरपंच उपसरपंचासहीत सदस्य बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

तालुका संघटक राघोजी सावंत यांचा पुढाकार व गावविकासाची ग्वाही

सावंतवाडी, दि.१६: असनिये ग्रामपंचायत सरपंचांसह सदस्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका संघटक राघोजी सावंत व तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी प्रवेश कर्त्यांचे पक्षात स्वागत केले. दरम्यान यापूर्वी या ग्रामपंचायतीवर भाजपाने आपला दावा केला होता. त्यामुळे त्यांना हा धक्का मानला जात आहे.गावच्या विकासासाठी त्यांनी हा प्रवेश केला असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच रेश्मा सावंत, उपसरपंच साक्षी सावंत, निधी नाईक, दर्शना दामले, भरत सावंत, राकेश सावंत, संदीप सावंत, आनंद ठिकार, जितेंद्र सावंत यांसह अनेकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील अशोक नाईक, प्रशांत कोरगावकर, अशोक खोबरेकर, वसंत मेस्त्री, वासुदेव गडेकर, वामन मठकर तर तळवणेतील माजी सरपंच मिलिंद कांबळी, सतिश रेडकर, तिरोडा येथील माजी सरपंच अनिल केरकर, निलेश सावंत, कृष्णा केरकर, पुरूषोत्तम केरकर आदींनी प्रवेश केला. तर अँड. निता सावंत- कविटकर यांची बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महिला जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, अनारोजीन लोबो, रघुनाथ रेडकर, गजानन नाटेकर, सचिन वालावलकर, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!