लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आंबोलीतील पायाभूत सुविधा मोडकळीस..
▪️आ़ंबोलित पर्यटनाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पर्यटकांची संख्या घटली..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : केशव जाधव
🎴आंबोली,दि.१६: महाराष्ट्र राज्यातील प्रति महाबळेश्वर म्हणून संबोधले जाणार्या थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत कोणत्याही पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आंबोलीत पर्यटकांनी पाठ फिरवील्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.
आंबोली बस स्थानक शेजारी असलेले स्वच्छता गृह पूर्णपणे मोडकळीला आले आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी पत्रकार काका भिसे यांनी उठाव करून सलग तीन दिवस उपोषण केले होते. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासनापलिकडे काही दिले नाही. लोकप्रतिनिधींची अनास्था, खोटी आश्वासने, यामुळे पायाभूत विकासापासून आंबोली वंचित आहे. आंबोलीच्या पर्यटनावर पोट भरणारे व्यावसायिक मात्र आता हतबल झाले आहेत.
आंबोलीत उतरलेल्या पर्यटकांना साधी टॉयलेट ची सुविधा उपलब्ध नाही. त्यांना जंगलाचा आसरा घ्यावा लागतो, यावरूनच प्रशासनाची पर्यटन प्रेमी असलेली मानसिकता दिसून येते. असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
आंबोली याठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानक आहे. मात्र, बस स्थानकात पुरातन काळी बांधलेले प्रसाधनगृह आता पूर्णपणे मोडकळीस आले असून वरचे पत्रेही उडून गेले आहे. तर अर्धवट पडलेल्या भिंती उभ्या आहेत. याबाबत वारंवार उठाव करून देखील प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
काही पर्यटक मोडकळीला आलेल्या प्रसाधनगृहातच आपले सगळे विधी उरकून घेतात. त्यामुळे पाण्याची वगैरे व्यवस्था नसलेल्या त्या ठिकाणी प्रवासी जाण्याचे धाडस करत नाही. प्राथ विधी उरल्यामुळे ते दुर्गंधीचे साम्राज्य आहे. बसस्थानक परिसरातही भल्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्या ठिकाणी सफाई कर्मचारी नसल्यामुळे व याकडे पाहायला कोणालाही वेळ नसल्याने महाबळेश्वर म्हणून समजल्या जाणाऱ्या आ़ंब़ोलीची दुरावस्था झाली आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_