आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 ज्येष्ठ कवी प्रकाश ग. जाधव यांना चंद्रकांत खोत स्मृती पुरस्कार जाहीर

 

*🟥 14 जानेवारी रोजी मुंबई साहित्य संघात पुरस्काराचे वितरण*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१२:-* सिंधुदुर्ग सुपुत्र आणि मराठीतील ख्यातनाम लेखक चंद्रकांत खोत यांच्या स्मृती प्रित्यर्थ यावर्षीपासून देण्यात येणाऱ्या चंद्रकांत खोत स्मृती साहित्य पुरस्कारासाठी कोकणातील प्रसिद्ध कवी प्रकाश ग जाधव यांची निवड करण्यात आली आहे. 5,555 रुपये स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराने 14 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव साहित्य संघात होणाऱ्या एकता कल्चर महोत्सवात सिने नाट्य अभिनेते नागेश मोरवेकर यांच्या हस्ते कवी जाधव यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत खोत मित्र परिवारातील डॉ रमेश यादव यांनी दिली.

चंद्रकांत खोत म्हणजे एक भन्नाट व्यक्तिमत्व. लेखक म्हणून जेवढे मोठे तेवढेच परखड वक्तव्यासाठीही प्रसिद्ध. त्यांचा ‘मर्तक’ काव्यसंग्रह बहुचर्चित ठरलाच पण ‘अ ब क ड ई’ दिवाळी अंकाने मराठी साहित्यात इतिहास निर्माण केला. आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र हिंदी साहित्यातील ज्येष्ठ कवी आणि अनुवादक डॉ. रमेश यादव आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे चंद्रकांत खोत स्मृती पुरस्कार सुरू करण्यात आला. यावर्षीच्या या पहिल्याच पुरस्कारासाठी कवी जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. गेली ३६ वर्षे प्रकाश ग. जाधव हे एकता कल्चरल अकादमीच्या माध्यमातून राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीत सक्रीय आहेत. संदर्भहिन फुलांच्या कविता, क्षितीज हरवलेल्या शहरात, अस्वस्थ काळजावरचं मोरपिस, मनाच्या तळघरातला प्रकाश, आयुष्याला पुरेल इतकं या कविता संग्रहांसह त्यांचे अन्य चार प्रातिनिधीक काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. एकता महोत्सवात कवी जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे महानगर पालिकेचे उपायुक्त संदिप माळवी आहेत. यावेळी एकताच्या पुरस्कारांचेही वितरण होणार असून एकता महोत्सवाची सांगताही होणार असल्याची माहिती डॉ. यादव यांनी दिली.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!