कोलगाव प्रीमियम लीग २०२३ मध्ये रोवंश क्रिकेटर्स संघाची बाजी;प्लेबॉयज भटवाडी संघ उपविजेता
*कोलगाव प्रीमियम लीग २०२३ मध्ये रोवंश क्रिकेटर्स संघाची बाजी;प्लेबॉयज भटवाडी संघ उपविजेता*
सावंतवाडी, दि.०८:- कोलगाव प्रीमियम लीग २०२३ क्रिकेट स्पर्धा दिनांक ०६,०७,०८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती,ह्यास्पर्धेत अंतिम सामना रोवंश क्रिकेटर्स विरुद्ध प्लेबॉयज भटवाडी संघ असा झाला मात्र रोवंश क्रिकेटर्स संघाच्या उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी च्या जोरावर प्लेबॉयज भटवाडी संघाला पराभवाची धूळ चारत रोवंश क्रिकेटर्स संघ विजेता ठरला आहे.रोवंश क्रिकेटर्स संघ हा गेल्या पर्वा पासून च नवीन संघ होता मात्र अवघ्या दुसऱ्या वर्षीच कोलगाव प्रीमियम लीग च्या चषकावर आपले नाव कोरले आहे.
कोलगाव सरपंच संतोष राऊळ ह्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी उपसरपंच दिनेश सारंग, ग्रामपंचायत पंचायत सदस्य संदीप हळदणकर, रोहित नाईक,राहुल माटेकर यासह मान्यवर उपस्थित होते विजयी संघाचे मान्यवरांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

