महाराष्ट्रराजकीय

🟥 केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील डाव उधळला जाईल ; संजय राऊत असं का म्हणाले?

🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई, दि-०८:-* येत्या 12 जानेवारीपासून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या वादावर सुनावणी होणार आहे. धनुष्यबाण चिन्हं कुणाला द्यायचं यावर आयोगासमोर सुनावणी होणार आहे. त्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटातील सर्व आमदार तसेच खासदारांची निवडणूक आयोगापुढे परेड होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत काय होतं? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. आमचा आयोगावर विश्वास आहे. त्यामुळे केंद्राच्या दबावापोटी राज्यात जे घडवलं, तो डाव उधळला जाईल, / असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या सर्व नेमणुका सरकार करतं तरीही आयोगावर आम्ही विश्वास ठेवतो. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. आतापर्यंत स्वायत्ता आणि स्वातंत्र्य दिसलं नाही. तरीही आम्ही देशातील प्रमुख स्तंभ आहेत, त्यावर विश्वास ठेवतो. न्यायालयावर आमचा प्रचंड विश्वास आहे. अजूनही या देशात संविधान, न्याय आणि कायदा जिवंत आहे असं आम्ही मानतो, असं संजय राऊत म्हणाले.

केंद्राच्या राजकीय दबावापोटी जे काही महाराष्ट्रात घडवलं आहे. तो डाव उधळला जाईल. या देशातील घटना आणि न्याय जिवंत आणि शाबूत आहे याचा साक्षात्कार देशाला होईल याची खात्री आहे, असं राऊत म्हणाले. आम्ही पूर्ण तयारी केली आहे. शिवसेना एकच आहे. एकच राहील. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती. त्या सेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. 30-35 लोकं सोडून गेले. आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, त्यांना आम्ही तिकीट दिलं, ते सोडून गेले म्हणजे पक्ष गेला नाही.

ते पुन्हा पराभूत होतील, असं सांगतानाच आमच्यासमोर शेषन यांचा आदर्श राहिला आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला न्याय मिळणार आहे, असं ते म्हणाले.

राज्यपालांनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. सरकारमध्ये खुर्व्यांना फेविकॉल लावून बसले आहेत. ते सर्व विषयावर बोलतात पण महाराजांच्या अपमानावर बोलत नाहीत.

ते पुन्हा पराभूत होतील, असं सांगतानाच आमच्यासमोर शेषन यांचा आदर्श राहिला आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला न्याय मिळणार आहे, असं ते म्हणाले.

राज्यपालांनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. सरकारमध्ये खुर्व्यांना फेविकॉल लावून बसले आहेत. ते सर्व विषयावर बोलतात पण महाराजांच्या अपमानावर बोलत नाहीत. मला वाटलं होतं एखादा केंद्रीय मंत्री, मायका लाल स्वाभिमानाने उभा राहील आणि राजीनामा देऊन महाराष्ट्रात परतेल. शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठी त्याग केला म्हणून सांगेल. पण सर्व गांडूची औलाद आहे, असा हल्ला त्यांनी केला. बीकेसीच्या सभेतच मी हे बोललो होतो. त्यातच मी औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला असल्याचं सांगितलं होतं. म्हणून देशात कुठे घडतं का असं म्हटलं होतं. देशाला माहीत नव्हतं औरंगजेबाचा जन्म दाहोद मध्ये झाल्याचं. भाजप औरंगजेबाला औरंगजेबजी म्हणते. त्यामुळे भाजपच्या भाषेतच सांगायचे म्हणजे औरंगजेबजींचे पिताश्री गुजरातचे सुभेदार होते, असा टोला त्यांनी लगावला.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!