कोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कौल देणाऱ्या गावात क्रिकेटच्या निमित्ताने रंगताहेत जुगाराचे फड

कौल देणाऱ्या गावात क्रिकेटच्या निमित्ताने रंगताहेत जुगाराचे फड

कुंभकर्णाच्या आळी मध्ये सुरू असलेले क्रिकेट सामने जुगाऱ्यांसाठी पर्वणी
सावंतवाडी

सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कौल देणाऱ्या एका गावात कुंभकर्णाच्या आळी मध्ये क्रिकेटच्या निमित्ताने तीन पत्ती जुगारांचे फड मोठ्या प्रमाणात रंगत असून संबंधित गावच्या बीट अंमलदारने मात्र कानावर हात घेतले आहेत.
साउत नावाच्या या बीड अंमलदाराने सदरच्या ठिकाणी तीन पत्ती जुगाराचे फड रंगले असतानाही इथे काहीच नाही अशा प्रकारचे निरीक्षण नोंदवून जुगारांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे, यामागे त्यांचे हात ओले झाले असावे असा असा संशय स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
गावात कोणतेही निमित्त करून अशा प्रकारचे जुगाराचे फड रंग असतात ,दशावतारी नाटक, क्रिकेटचे सामने ,असले की घनदाट जंगलाचा आसरा घेत किंवा एखाद्या शेतमांगरात अशा प्रकारचा तीन पत्ती जुगार दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात सुरू असतो, असाच जुगार सध्या कुंभ करणाच्या आळी मध्ये क्रिकेटच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात सुरू आहे, सदरच्या गावात सुरू असलेले अनैतिक धंदे पोलीस बंद करतील का किंवा पोलिसांना त्या धंदेवाल्यांकडून हप्ता मिळत आहे असा खडा सवाल ग्रामस्थातून विचारला जात आहे, क्रिकेटच्या नावाखाली तीन पत्ती चे जुगार भावी पिढीला बरबाद करत असतील तर अशा प्रकारच्या चुकीच्या प्रवृत्तीची पाळे मुळे खोदून काढून पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!