कोकण लाईव्ह चे भाकीत ठरले खरे, इन्सुलीतील युवकांकडून पत्रादेवी येथे पाच लाखाचा गांजा जप्त
कोकण लाईव्ह चे भाकीत ठरले खरे, इन्सुलीतील युवकांकडून पत्रादेवी येथे पाच लाखाचा गांजा जप्त
सिंधुदुर्ग जिल्ह्याला अंमली पदार्थाचा विळखा, हे झाले सिध्द,-आता लढावी लागेल आर पार ची लढाई.
*🎴सावंतवाडी, दि-०६:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात गांजा चरस अशा अवैध धंद्यांना ऊत अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या की झोपी गेलेले बेवडेही जागे होतात व शांत, संस्कृत सावंतवाडी शहराला गालबोट लावले जाते असे सांगून आपणच सावंतवाडीचे रक्षण कर्ते आहोत असे भासवण्याचा प्रयत्न करतात, मात्र कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल कधीच हवेत बाण मारत नाही,आम्ही केलेल्या आरोपात 100% सत्य असतातहे अनेक वेळा सिद्ध झाले आहे,आजही सावंतवाडी इन्सुली येथील साजीद सनदी ( वय-31) या तरुणाकडून पत्रादेवी येथे पणजीच्या गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी हायवेवर सापळा रचून इन्सुली येथील साजिद सनदी याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्या कडून 5.50 किलोचा पाच लाख किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
आम्ही यापूर्वीच्या बातमीमध्ये गोव्यात शेख तर सावंतवाडी बेग अमली पदार्थांचे मूळ हेच अशा प्रकारची बातमी प्रसिद्ध केली होती. त्याचे मुख्य कारण हेच होते.आज शाळा ,महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मुलांकडे गांजा चरस सहज उपलब्ध होऊ लागला आहे, तंबाखू सारखा गांजा उपलब्ध होऊ लागल्याने ही शालेय मुले नशेच्या आहारी जात आहेत. त्यातून रात्रीच्या चालणाऱ्या पार्ट्या यामध्ये ही मुले आपले जीवन उध्वस्त करून घेत असल्याची बातमी आम्ही प्रसिद्ध करताच दारू मध्ये तर्र असलेले बेवडे जागे झाले व सावंतवाडी सारख्या शांत सुसंस्कृत शहराला अशा प्रकारचे लिखाण करून बदनाम करत असल्याचा आव आणू लागले. मात्र असा आव आणणारी मंडळी या धंद्यात असावी असा संशय आम्हाला आता येऊ लागला आहे.
आम्हाला आमच्या उद्दिष्टांपासून परावृत्त करण्यासाठी अशा प्रकारची आवई हे लोक उठवू लागले आहेत मात्र अशा तीन पार् लोकांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही. त्यामुळे आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करतो म्हणून अशा कोणी कितीही आवई उठवल्या तरी त्याला आम्ही भीक न घालता अवैद्द धंद्या विरुद्धचा लढा आमचा शेवटपर्यंत सुरूच राहणार आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गाच्या बॉर्डरवर म्हणजेच पत्रा देवीला सावंतवाडी इन्सुली येथील गांजा तस्करा कडून गांजा जप्त केला जातो याचा अर्थ याची पाळेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पसरली आहेत हे सिद्ध होते.
दहा ग्रॅम चा गांजा मिळाला म्हणून शाहरुख खानच्या मुलाविरुद्ध टाहो फोडणारे राजकीय पदाधिकारी, अधिकारी ,आता कुठच्या बिळात तोंड घालून लपले आहेत हा आमचा सवाल आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला या नशिला पदार्थाच्या विळख्यातून सोडवायचे असेल तर जनजागृती होणे ही काळाची गरज आहे, ही जनजागृती करत असताना या धंद्यात असणारे पिल्लू टील्लू हे आकांड तांडा करणारच त्यांच्या आकांड तांडांकडे आम्ही लक्ष देणारच नाही उलट अशा तिनपाटांची यादी तयार करुन ती राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडे देणार आहोत. म्हणून तुम्ही ओरडायचे तेवढे ओरडा, मात्र सत्य परेशान हो सकता है पराजित नही हे संबंधितांनी ध्यानी ठेवावे.
या धंद्याची पाळेमुळे मुळापासून उखडून टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही कारण हे लोन प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, जे प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे अधिकारी आहेत त्यांनी हे ध्यानी ठेवावे, तुमची ही मुलेबाळे आहेत, तुमच्याही घरापर्यंत हे लोन येऊ शकतात त्यावेळी मात्र वेळ गेलेली असेल.त्यामुळे म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय, अधिकाऱ्यांनी आपल्यातील सदसद्विवेकबुद्धी जागृत करून या धंद्याची पाळेमुळे शोधून काढावी असे आमचे जाहीर आवाहन त्यांना आहे अशा अधिकाऱ्यांचा भर चौकात सत्कार करायलाही आम्ही मागे पुढे पाहणार नाही.
याविरुद्ध जनजागृती लढा उभारणे हे पण काळाची गरज आहे, यापुढे सुजाण पालकांना ,विद्यार्थ्यांना एकत्र करून अमली पदार्थांच्या विरोधात लढा उभारावा लागणार आहे ,यासाठी सर्वांनीआम्हाला साथ द्यावी असे आवाहन या निमित्ताने आम्ही करत आहोत, समाज सुधारायला गेल्यावर आरोप होणारच, शिंतोडे उडणारच ,कारण ज्या ज्या समाजसुधारकांनी अशा प्रकारचे प्रयत्न केले त्यांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागले, म्हणून ते थांबले नाहीत म्हणूनच अनेक चालीरीती प्रथा परंपरा बंद झाल्यात, स्त्री शिक्षणाची चळवळ उभी राहिली, हे घडले नसते तर आज स्त्रिया शिकल्या नसत्या त्यामुळे कोण काय म्हणतो? कोण नशेतून जागृत होतो?कोण आव्हान प्रती आव्हान देतो याकडे न पाहता या विकृतीची पाळे मुळे मुळापासून उखडून टाकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे नाहीतर हे लोन आपल्या घरापर्यंत पोहोचतील एवढे मात्र निश्चित.

